ग्रामपंचायत कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
अमरावती 1 ऑगस्ट (हिं.स.) दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्येच अमर वानखडे या इसमाने सकाळी दहाच्या सुमारास वीस प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे स्वतः व्हिडिओ काढून आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे तसाच स
ग्रामपंचायत कार्यालय मध्ये विष प्राशन करून केला आत्महत्येचा प्रयत्न


अमरावती 1 ऑगस्ट (हिं.स.) दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्येच अमर वानखडे या इसमाने सकाळी दहाच्या सुमारास वीस प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे स्वतः व्हिडिओ काढून आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे तसाच सोशल मीडियावर अपलोड सुद्धा करण्यात आलेला आहे. दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथील ग्रामपंचायत मधील लोकांच्या विविध समस्या संदर्भात दर्यापूर पंचायत समिती कार्यालयावर त्या गावातील लोक धडकले सुद्धा होते. त्याच माध्यमातून वडनेर गंगाई येथील अमर वानखडे या इसमाने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच व चंद्रशेखर हुतके या दोघांचे नाव घेऊन अमर वानखडे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे सविस्तर वृत्त असे की अमर वानखडे हा ग्रामपंचायत वडनेर गंगाई येथील रहिवासी असून आपल्या विविध मागण्या संदर्भात ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांच्याकडे सही मागण्याकरिता वारंवार जात असून सुद्धा ते मला सही देण्यास नकार देत आहेत माझ्या कुठल्याच गोष्टीचा खंडन सुद्धा करत नाहीत माझ्या नावाने यांनी येवदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे आहे, आज दिनांक रोजी मी माझ्या मागण्या घेऊन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेलो असता मला आज सुद्धा उडवा उडवी चे उत्तरे देण्यात आलेली आहे म्हणून मी आज रोजी ग्रामपंचायत कार्यालय वडनेर गंगाई येथे विष प्राशन करून आत्महत्या करीत आहे माझ्या जिवित्वाला काही कमी जास्त झाल्यास सर्वस्वी जबाबदार ग्रामपंचायत सरपंच व चंद्रशेखर हुतके सर्वस्वी जबाबदार राहतील असा आरोप अमर वानखडे यांनी केलेला आहे पुढील तपास येवदा पोलीस स्टेशन करीत आहे.

यासंदर्भात सरपंच गौकर्णा इंगळे म्हणाल्या की, अमर वानखडे हा इसम आम्हाला वारंवार आत्महत्या करण्याच्या धमक्या देत होता सदर घटनाक्रम माझ्यासमोर झालेला नसून मला याच्याबद्दल काहीच माहिती नाही. तर वडनेर गंगाई ग्रामपंचायत कार्यालयाचे सचिव विलास यादव म्हणाले की, सदर इसम माझ्यासमोर पडलेला होता म्हणून मी पोलीस स्टेशन यांना फोन केला आत्महत्या का करत आहे मला माहिती नाही असे त्यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी / मनीष कुलकर्णी


 rajesh pande