मध्य रेल्वेने अतिरिक्त ३८ फेऱ्यांसाठी विशेष गाड्यांची सेवा वाढवली
मुंबई, 1 ऑगस्ट, (हिं.स.) - मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची प्रचंड मागणी लक्षात घेता तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त ३८ फेऱ्यांसाठी खालील विशेष गाड्यांच्या सेवा वाढवणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस - सुभेदारगंज साप्ताहिक विशेष (१० फेऱ
मध्य रेल्वेने अतिरिक्त ३८ फेऱ्यांसाठी विशेष गाड्यांची सेवा वाढवली


मुंबई, 1 ऑगस्ट, (हिं.स.) - मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची प्रचंड मागणी लक्षात घेता तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त ३८ फेऱ्यांसाठी खालील विशेष गाड्यांच्या सेवा वाढवणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस - सुभेदारगंज साप्ताहिक विशेष (१० फेऱ्या)

04116 साप्ताहिक विशेष दर शुक्रवारी दि. ०२.०८.२०२४ ते दि. ३०.०८.२०२४ पर्यंत वाढविणार (५ फेऱ्या)

04115 साप्ताहिक विशेष दर गुरुवारी दि. ०१.०८.२०२४ ते दि. २९.०८.२०२४ पर्यंत वाढविणार (५ फेऱ्या)

पुणे - झाशी साप्ताहिक विशेष (८ फेऱ्या)

01921 साप्ताहिक विशेष दर गुरुवारी दि. ०८.०८.२०२४ ते दि. २९.०८.२०२४ पर्यंत वाढविणार (४ फेऱ्या)

01922 साप्ताहिक विशेष दर बुधवारी दि. ०७.०८.२०२४ ते दि. २८.०८.२०२४ पर्यंत वाढविणार (४ फेऱ्या)

दौंड-अजमेर साप्ताहिक विशेष (१० फेऱ्या)

09626 साप्ताहिक विशेष दर शुक्रवारी दि. ०२.०८.२०२४ ते दि. ३०.०८.२०२४ पर्यंत वाढविणार (५ फेऱ्या)

09625 साप्ताहिक दर गुरुवारी विशेष दि. ०१.०८.२०२४ ते दि. २९.०८.२०२४ पर्यंत वाढविणार (५ फेऱ्या)

साईनगर शिर्डी - बिकानेर साप्ताहिक विशेष (१० फेऱ्या)

04715 साप्ताहिक विशेष दर रविवारी दि. ०४.०८.२०२४ ते दि. ०१.०९.२०२४ पर्यंत वाढविणार (५ फेऱ्या)

04716 साप्ताहिक विशेष दर शनिवारी दि. ०३.०८.२०२४ ते दि. ३१.०८.२०२४ पर्यंत वाढविणार (५ फेऱ्या)

वर नमूद केलेल्या गाड्यांच्या वेळा, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

आरक्षण : विशेष शुल्कासह विशेष ट्रेनच्या सर्व वाढीव फेऱ्यांसाठी बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेस्थळावर सुरू होईल.

या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने / हर्षदा गावकर


 rajesh pande