फुरसुंगीत मेडिकलमध्ये घुसून दुकानदारावर चाकूने वार
पुणे, 12 सप्टेंबर (हिं.स.)। पुण्यामध्ये गुन्ह्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या घटना कानावर पडत आहेत. असाच एक प्रकार फुरसुंगी येथे घडला आहे. उधार औषध-गोळ्या दिल्या नाहीत म्हणून फुरसुंगी येथील मेडिकल दुकानदारावर दु
फुरसुंगीत मेडिकलमध्ये घुसून दुकानदारावर चाकूने वार


पुणे, 12 सप्टेंबर (हिं.स.)। पुण्यामध्ये गुन्ह्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या घटना कानावर पडत आहेत. असाच एक प्रकार फुरसुंगी येथे घडला आहे. उधार औषध-गोळ्या दिल्या नाहीत म्हणून फुरसुंगी येथील मेडिकल दुकानदारावर दुकानात घुसून हल्ला करण्यात आला आहे. दुकानदारावर चाकूने हातावर, डोक्यावर वार करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वैभव तुकाराम मखरे हा मेडिकल दुकानदार यात गंभीर जखमी झाला आहे. आरोपी मनोज सुदाम आडागळे याने हे कृत्य केलं आहे. वार करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यातील हडपसर परिसरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण हे वाढलेले दिसून येत आहे. त्याचच हे आणखी एक उदाहरण आहे.आयटी हब, सांस्कृतिक राजधानी, पेन्शनधारकांचे शहर अशी बिरूदावली मिरविणाऱ्या पुण्याची आता गुन्हेगारांचे शहर अशी ओळख निर्माण होऊ पाहतेय. नक्कीच ही ओळख पुण्याच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी चांगली नाही. मागील आठ महिन्यांत शहरात तब्बल ६५ जणांचे खून झाले. तर ९९ जणांवर खुनी हल्ले झाले. त्यातच वनराज आंदेकर यांच्या खुनामुळे टोळीयुद्धाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत पोलिसांसमोर गुंडांवर अंकुश ठेवण्याचे आव्हान असणार आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande