कोकण रेल्वेच्या तीन दिवस खेड-मुंबई विशेष गाड्या
रत्नागिरी, 12 सप्टेंबर, (हिं. स.) : गणपती विसर्जनानंतर मोठ्या संख्येने मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची होणारी गर्दी लक्षात घेत कोकण रेल्वेने खेडमधून उद्यापासून तीन दिवस सहा विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. या गाड्या पनवेलपर्यंत धावतील. उद्या, १३
कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या कोकणात दाखल


रत्नागिरी, 12 सप्टेंबर, (हिं. स.) : गणपती विसर्जनानंतर मोठ्या संख्येने मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची होणारी गर्दी लक्षात घेत कोकण रेल्वेने खेडमधून उद्यापासून तीन दिवस सहा विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे.

या गाड्या पनवेलपर्यंत धावतील. उद्या, १३ सप्टेंबरपासून सकाळी सहा आणि दुपारी सव्वातीन वाजता खेड स्थानकातून या अनारक्षित गाड्या रवाना होतील. या गाड्यांना वीस डबे असतील. या गाड्यांना खेड ते रोह्यार्यंत सर्व स्थानकाला थांबे असतील. पुढे या गाड्या पनवेलला थांबतील. दि. १५ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वातीन वाजता सुटणारी गाडी सीएसटीएमपर्यंत धावेल. या गाडीला पनवेल, दादर आणि ठाणे स्थानकातही थांबा असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande