'मुख्यमंत्री योजनादूत’उपक्रमासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस
धुळे, 12 सप्टेंबर (हिं.स.) शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. राज्यात एकूण 50 हजार योजनादूत नेमण्यात येणार असून आजपर्यंत राज्यात 1 लाख 16 हजार 143 तर धुळे 1 हजार 643
'मुख्यमंत्री योजनादूत’उपक्रमासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस


धुळे, 12 सप्टेंबर (हिं.स.) शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. राज्यात एकूण 50 हजार योजनादूत नेमण्यात येणार असून आजपर्यंत राज्यात 1 लाख 16 हजार 143 तर धुळे 1 हजार 643 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. 7 सप्टेंबर, 2024 पासून या उपक्रमासाठी नोंदणी सुरु झाली असून आज 13 सप्टेंबर, 2024 हा www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचा शेवटचा दिवस आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या उपक्रमासाठी नावनोंदणीचे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण 50 हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. शासनाच्या योजनादूत उपक्रमास राज्यातील उमेदवारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत असून आतापर्यंत राज्यात 1 लाख 16 हजार 143 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहेत. तर धुळे जिल्ह्यात 827 योजनादूत निवडण्यात येणार असून याकरीता 1 हजार 643 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या योजनादूतांना दरमहा 10 हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.

असे आहेत निवडीचे निकष

या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार 18 ते 35 वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

ही कागदपत्रे आवश्यक

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे/प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. या उपक्रमासाठी ऑनलाईन नांवनोंदणीचा आज 13 सप्टेंबर 2024 हा शेवटचा दिवस आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande