नाशिक , 12 सप्टेंबर (हिं.स.)।
संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार व खा.शाहु महाराज यांच्या उपस्थितीत प्रमुख वक्ते ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम व श्री स्वामी समर्थ यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. वास्तविक प्रभु श्रीराम हे देशाचे आराध्य दैवत आहे तर श्री स्वामी समर्थ हे महाराष्ट्रात धार्मिक व अध्यात्मिक म्हणुन घराघरात पोहोचले आहे. अशा महान विभुतीवर निंदाजनक, आक्षेपार्ह बोलुन ज्ञानेश महाराव यांनी स्वतःला सवंग लोकप्रियता मिळविण्याचा व शरद पवार व खा. शाहु महाराज यांची शाबासकी मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.ज्ञानेश महाराव जे बोलले ती स्क्रिप्ट शरद पवार यांची होती का, मग ते गप्प का बसले, त्यांच्या या वादग्रस्त विधानामागे कोण आहे.यामुळें देशातील तमाम हिंदूंच्या भावनांना ठेच पोहचली आहे. ज्ञानेश महाराव यांच्या या वादग्रस्त विधानामुळे संत, महंत, सर्व हिंदु संघटना, आध्यत्मिक व धार्मिक संघटना व संस्था नाराज झाल्या असुन तीव्र संताप व्यक्त करत आहे.
त्याचा निषेध म्हणुन पंचवटी येथे काळाराम मंदिराच्या समोर संत, महंत, हिंदु धार्मिक संघटना, भाजप यांनी एकत्र येऊन तीव्र निषेध आंदोलन केले. यावेळी जय जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरम्, जय जय श्री स्वामी समर्थ अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष प्रशांत जाधव, आ.ॲड.राहुल ढिकले, माधवदास राठी महाराज, भक्तीचरणदास महाराज, आचार्य नाना धोंगडे महाराज, तुषार भोसले,पंडित मेघश्याम महाराज, राहुल महाराज साळुंखे, सतिश शुक्ल आदींसह नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI