व्यावसायिक शेतीचे शाश्वत आधुनिक तंत्रज्ञान जाणून घ्या- कुलगुरू डॉ. शरद गडाख
अकोला, 19 सप्टेंबर (हिं.स.)। बदलत्या जागतिक परिस्थितीत शाश्वत शेती व संपन्न शेतकरी संकल्पना जोपासत वैश्विक पटलावर सर्वाधिक लोकसंख्यांक होऊ पाहणाऱ्या आपल्या देशातील जनतेला दोन वेळचे सकस अन्न उपलब्ध करून देण्यासाठीचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
P


अकोला, 19 सप्टेंबर (हिं.स.)।

बदलत्या जागतिक परिस्थितीत शाश्वत शेती व संपन्न शेतकरी संकल्पना जोपासत वैश्विक पटलावर सर्वाधिक लोकसंख्यांक होऊ पाहणाऱ्या आपल्या देशातील जनतेला दोन वेळचे सकस अन्न उपलब्ध करून देण्यासाठीचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ निर्मित शेती विषयक तंत्रज्ञान तथा पीक वाणांचे शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष अवलोकन करता यावे तसेच अत्याधुनिक शेती तंत्र आत्मसात करीत फायद्याच्या शेतीचे अनेक अनेक पैलू प्रत्यक्ष बघता यावे व शास्त्रज्ञासोबत चर्चेद्वारे शेतीविषयक शंका समाधान करता यावे या हेतूने विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत आयोजित तीन दिवसीय शिवार फेरीत सहपरिवार सहभागी होत या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले आहे.

20 ते 22 सप्टेंबर दरम्यान आयोजित शिवार फेरीचे करण्यात आले असून या तीन दिवसीय शिवार फेरीसाठी नोंदणी 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता पासून करण्यात येणार आहें. नोंदणी नंतर विद्यापीठाचे वाहनाद्वारे विविध प्रक्षेत्र व संशोधन विभागाना प्रत्यक्ष भेटी देण्याची संधी शेतकरी बांधवांना उपलब्ध झाली असून शेतकरी बांधवांचे स्वागतासाठी विद्यापीठ सज्ज असल्याचे संचालक विस्तार शिक्षण तथा आयोजक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी नमूद केले.

शिवार फेरीत सहभागी होणाऱ्या शेतकरी बंधू भगिनींना खरीप हंगामातील जवळपास सर्व पिके व त्यांचे तंत्रज्ञान प्रत्यक्ष बघता यावे या हेतूने माननीय कुलगुरु डॉ शरद गडाख यांच्या संकल्पनेतून या वर्षी शिवार फेरी 2024 चे आयोजन करण्यात येणार असून गहू संशोधन विभागाचे प्रक्षेत्रावर शेतकरी बांधवाना पाहण्यासाठी एकाच ठिकाणी खरीप पिकांचे विविध जातीचे पीक प्रात्यक्षिक घेण्यात आलेले आहेत.त्यामध्ये विविध पिकांच्या जाती लावण्यात आले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तेलबिया,कडधान्य, तृनधान्य,कापूस, चारापिके, भाजीपाला पिके व फुलांचे जाती येथे लावण्यात आलेले आहेत. तसेच विद्यापीठाचे महत्वाचे 12 शिफारशी चे पण प्रात्यक्षिक येथे घेण्यात आले आहेत. तसेच कंपोस्ट व गांडूळ खताचे पण प्रात्यक्षिक येथे घेण्यात आले आहे. या शिवार फेरीचे निमित्ताने शेतकरी बंधू भगिनींना आपल्या शेतीविषयक समस्यांचे तज्ञांकडून वेळीच करण्याची ही सुवर्णसंधीच उपलब्ध होणार आहे.

विदर्भासह राज्यातील सर्वच विभागातील शेतकरी बंधू भगिनींनी या शिवार फेरीचा लाभ घ्यावा व येणारा हंगाम यशस्वी करावा असे आवाहन देखील विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे आणि संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande