ईद मिलादुन्नबी निमित्त अकोला शहरातून निघाला भव्य जुलूस
अकोला, 19 सप्टेंबर (हिं.स.)। जगाला मानवता आणि बंधुत्वाचा संदेश देणारे व इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त जश्ने ईद ए मिलादुन्नबी जुलूस आज, 19 सप्टेंबरला अकोला शहरातून मोठ्या उत्साहात निघाला. जुलूसमध्ये सामाजिक सद्भाव
P


अकोला, 19 सप्टेंबर (हिं.स.)।

जगाला मानवता आणि बंधुत्वाचा संदेश देणारे व इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त जश्ने ईद ए मिलादुन्नबी जुलूस आज, 19 सप्टेंबरला अकोला शहरातून मोठ्या उत्साहात निघाला. जुलूसमध्ये सामाजिक सद्भावनेचे दर्शन घडले. ईद ए मिलादुन्नबीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्याची शहरात परंपरा आहे. ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून निघून शांततेत पार पडली. शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला. जुलूसचे सार्वजनिक गणेश उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

अनंत चर्तुदशी व दुसर्‍या दिवशी श्रीगणेश विर्सजन मिरवणुकीवर महाराष्ट्रात अकोट, शेगाव, जळगाव जामोदसह राज्यात काही ठिकाणी काही असामाजिक उपद्रवी लोकांनी दगडफेक करून राज्यातील सामजिक वातावरण बिघडविण्याचा व शांती सदभावाला नख लावण्याचे कृत्य केले आहे. या निंदनीय घटनेचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. मात्र शांती, अमन, आपसी सदभाव कायम राहो, या हेतुने अकोला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आज गांधी चौक येथे ईद- मिलादुन्नबीच्या जूलूसवर फूलांचा वर्षाव केला. जूलूस कमेटीचे अध्यक्ष हाजी मुदाम सह त्यांच्या सहकार्‍यांचे स्वागत केले. जूलूसवर 1000 किलो फूलांचा वर्षाव करून गणेशोत्सव मंडळाने त्या दगडफेकीच्या निदंनीय घटनेला शांती सदभावाचे उत्तर-संदेशच दिला आहे. कारण आपसी सदभावानेच राष्ट्राचा विकास होऊ शकतो, असा विश्वास आहे. दगडफेक सारख्या घटनेने फक्त दुषित वातावरण होवून हिंदू मुस्लिमसह सर्वाचेच नुकसानच होते,असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande