शेतात लागवड होणाऱ्या पिकांकरिता संरक्षित पाण्याची आवश्यकता असते तसेच मोकाट पाणी दिल्यामुळे पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी विविध सिंचन साहित्याचा पुरवठा योजना जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता सेस फंड अंतर्गत शेत जमिनीचा पोत सांभाळण्यासाठी व शेतीच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी योजना राबवली जात आहे.
*काय आहे योजना?*
विविध सिंचन साहित्याचा पुरवठा करणे या योजने अंतर्गत डिझेल इंजिन,पेट्रो-डिझेल पंपसंच,पेट्रोल पंपसंच, विद्युत पंपंसंच,HDPE पाईप,PVC पाईप, 2 HP, 3HP सिंगल फेज, थ्री फेज इलेक्ट्रीक मोटर व 5 HP व 7.5 HP थ्री फेज इलेकट्रीक मोटर या सिंचन साहित्याचा लाभ दिला जातो.
*लाभ किती मिळणार?*
प्रति लाभार्थी सिंचन साहित्य प्रति नग एकुण किंमतीच्या 75% किंवा जास्तीत जास्त रु.30,000/-
*कोणाला मिळणार लाभ?*
शेतकऱ्याकडे 7/12 व 8-अ उतारा असणे आवश्यक
शेतमजूर, बचतगट व ग्रामसंघांच्या, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बाबतीत रोजगार निर्मिती हा उद्देश असल्याने त्यांचे नावे शेतजमीन असण्याची आवश्यकता नाही.
या योजना DBT तत्वावर राबविली जात असल्याने शेतकऱ्याने आधारकार्ड व बँक पासबुक सादर करणे आवश्यक.
या योजनेकरिता जिल्ह्यातील सर्व वर्गवारीतील शेतकरी पात्र राहतील.
*अर्ज कुठे करावे?*
लाभार्थ्यांनी कृषि अधिकारी पंचायत समिती/ गट विकास अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करावा. कागदपत्रांची छाननी तालुकास्तरीय अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येईल. पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव अंतिम मंजूरीकरिता जिल्हा स्तरावर सादर करण्यात येईल. लाभार्थी मंजूरीचे अंतिम अधिकार कृषि समितीस राहतील.
शेतातील उत्पादन वाढीसाठी जिल्हा परिषद सेस फंडा अंतर्गत 80 लाख निधी विविध सिंचन साहित्याचा पुरवठा योजनेसाठी उपलब्ध असून शेतकरी बांधवाना या योजनेसाठी अर्ज करावे. - कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर