रत्नागिरी : संदीप ढवळ यांना क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मृती पुरस्कार प्रदान
रत्नागिरी, 4 सप्टेंबर, (हिं. स.) : श्री गुरू सामाजिक आणि सांस्कृतिक सेवा संस्थेचा क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मृती पुरस्कार ॲड. संदीप ढवळ यांना प्रदान करण्यात आला. शाहिरीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सामाजिक प्रबोधन करणाऱ्या श्री गुरू सामाजिक
अॅड संदीप ढवळ यांना पुरस्कार प्रदान


रत्नागिरी, 4 सप्टेंबर, (हिं. स.) : श्री गुरू सामाजिक आणि सांस्कृतिक सेवा संस्थेचा क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मृती पुरस्कार ॲड. संदीप ढवळ यांना प्रदान करण्यात आला. शाहिरीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सामाजिक प्रबोधन करणाऱ्या श्री गुरू सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या लांजा शाखेने महात्मा जोतीराव फुले स्मृती पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते आणि रत्नागिरीच्या श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. संदीप ढवळ यांना दिला. लांज्याचे गटविकास अधिकारी श्री. म्हेत्रे यांनी पुरस्कार प्रदान केला. हा कार्यक्रम लांजा येथील कुलकर्णी - काळे छात्रालयाच्या सभागृहात झाला. कार्यक्रमाला राज्य संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहीर हिंदुराव लोंढे (कोल्हापूर),. शाहीर गुलाबराव मुल्ला (सांगली), निवड समितीच्या अध्यक्षा. शाहीर चित्रा पाटील (मुंबई), लांजा शाखेचे अध्यक्ष काशिराम जाधव, गंगाराम हरमले गुरुजी, माजी जिल्हा परिषद सदस्य चांद खान, मोहन घडशी, शक्ती तुरा मंडळाचे अध्यक्ष श्री. पालकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. गटविकास अधिकारी. श्री. म्हेत्रे यांनी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मृती पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड केल्याचे मत व्यक्त केले. ॲड. ढवळ पेशाने वकील असले तरी कॉलेज जीवनापासून ते आजपर्यंत विविध सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या पूर्ण कुटुंबाशी माझी ओळख आहे. कुळ कायद्यासंदर्भातील त्यांनी केलेले काम विशेष उल्लेखनीय आहे. जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या अनेक गरजू रुग्णांना त्यांचा सर्वतोपरी मदतीचा हात असतो. शाहीर हिंदूराव लोंढे व शाहीर गुलाबराव मुल्ला यांनी सांगितले की, मनोरंजनाच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर समाजप्रबोधन केले पाहिजेतसेच बदलत्या काळात प्रबोधनातही बदल घडवून आणले पाहिजेत. पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल ॲड. ढवळ यांनी ऋण व्यक्त केले. यापुढेही सामाजिक कार्याचा वसा सुरू राहील, असे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande