खो-खो विश्वचषक २०२५ :भारतीय महिला संघाचा दक्षिण कोरियावर एकतर्फी विजय
नवी दिल्ली , 15 जानेवारी (हिं.स.)।पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचं भारतात आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेतील महिला संघाचा पहिला सामना दक्षिण कोरियाविरुद्ध होता. महिला संघाने कौशल्य दाखवत दक्षिण कोरिया दारूण पराभव केला. भारताने दक्षिण कोरियावर 175-
खो-खो विश्वचषक २०२५


नवी दिल्ली , 15 जानेवारी (हिं.स.)।पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचं भारतात आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेतील महिला संघाचा पहिला सामना दक्षिण कोरियाविरुद्ध होता. महिला संघाने कौशल्य दाखवत दक्षिण कोरिया दारूण पराभव केला. भारताने दक्षिण कोरियावर 175-18 गुणांच्या फरकाने विजय मिळवला. भारताने या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे.

प्रियांका इंगळेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात झेंडा रोवला.भारताने दक्षिण कोरियावर 175-18 गुणांच्या फरकाने विजय मिळवला.इतक्या मोठ्या फरकाने जिंकत भारताने इतिहास रचला आहे. कर्णधार प्रियांका इंगळे हिने नाणेफेक जिंकून प्रथम बचाव करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच डावाच 2 2 ड्रिम गुण मिळवत. दक्षिण कोरियाला 10 धावांवर रोखले.दुसऱ्या डावाच्या 7 मिनिटांत 92 गुण मिळवले. या कालावधीत टीम इंडियाने 3 खेळाडूंच्या एकूण 15 बॅचला बाहेर काढले. तिसऱ्या डावातही दक्षिण कोरियाला वरचढ होऊ दिले नाही आणि त्यांना केवळ 8 गुणांवर रोखले. चौथ्या डावात अप्रतिम लय कायम ठेवत आक्रमण करत 78 गुण मिळवले.

भारतीय संघाची स्टार खेळाडू नसरीन शेख हिने अप्रतिम कामगिरी करत सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला. तिच्या आक्रमक खेळाने आणि स्मार्ट रणनीतीने भारतीय संघाला मोठा विजय मिळवून दिला. चैथरा आर, कर्णधार प्रियांका इंगळे, मगाई माझी, मीनू, नसरीन शेख यांनी विजयात मोलाचे योगदान दिले.दुसरीकडे इराणने मलेशियाला 51-16 ने पराभूत केलं आहे. भारताचा पुढचा सामना हा इराणशी होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande