राजकोट, 15 जानेवारी (हिं.स.)।भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिका राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळवली जात आहे. या मालिकेत स्मृती मंधानाची आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली आहे. आयर्लंडविरुद्ध खेळताना स्मृती मंधानाने सर्वात वेगवान शतक झळकावलं आहे. तिने अवघ्या 70 चेंडूत चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करत आपलं शतक पूर्ण केलं. यासह ती भारतीय संघासाठी सर्वाधिक वेगवान शतक झळकावणारी फलंदाज ठरली आहे. स्मृती मंधानाने या शतकी खेळीसह खास विक्रमाला गवसणी घातली आहे. स्मृती मानधना हिने अवघ्या 70 चेंडूत शतक पूर्ण केले. या कामगिरीसह भारतीय महिला संघाकडून सर्वात जलदग शतकी खेळीचा विक्रम आता स्मृती मानधनाच्या नावे झाला आहे. स्मृती मानधना हिने आयर्लंड विरुद्धच्या आपल्या वादळी खेळीत 80 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 135 धावा काढल्या.स्मृती मानधना हिने ऑयर्लंड विरुद्धच्या जलद शतकी खेळीसह नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरचा विक्रम मोडित काढला आहे. हरमनप्रीत कौरनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 87 चेंडूत शतक झळकवल्याचा रेकॉर्ड आहे. भारतीय महिला संघाकडून सर्वात जलद शतक झळकवणाऱ्या बॅटरच्या यादीत ती आता दुसऱ्या स्थानावर असून स्मृती मानधना अव्वलस्थानी विराजमान झालीये. स्मृती मंधानाने या शतकी खेळीसह महिला क्रिकेटमधील 10 किंवा त्याहून अधिक एकदिवसीय शतके झळकावणाऱ्या निवडक फलंदाजांमध्ये आपले नाव नोंदवले आहे. मानधनाच्या व्यतिरिक्त, मेग लॅनिंगने 15 शतके आणि सुझी बेट्सने 13 शतके झळकावली आहेत. टॅमी ब्यूमोंटनेही 10 शतके केली आहेत. आयर्लंडविरुद्धच्या राजकोट एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजीला येताच, स्मृती मंधानाने आयर्लंडच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल केला.स्मृतीने ताबडतोड फलंदाजी करत प्रतिका रावलसोबत मिळून पावरप्लेमध्ये 90 धावा चोपल्या. या दोघींनी मिळून अवघ्या 77 चेंडूत शतकी भागीदारी केली.स्मृती मंधानाने फक्त 70 चेंडूत शतकी खेळी केली. तिने प्रतीकासोबत 200 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. 80 चेंडूंचा सामना करताना स्मृती मानधनाने 12 चौकार आणि 7 षटकार मारले आणि 135 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतली. ---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode