अमरावती 17 जानेवारी (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा येथे अवैध धंद्यांना सध्या ऊत आलाय. येवदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वरली, मटका, जुगार यासह विविध अवैध धंदे येवदा पोलीस पोलीसांच्या नाकावर टिचून खुलेआमपणे चालत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलाय.. एका दुकानात चक्क वरली चा हा धंदा चालत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय..त्यामुळे या ठिकाणी अनुचित प्रकार घडून सामाजिक शांततेला गालबोट लागण्याची शक्यता आहे.या ठिकाणी मटका लावणाऱ्यांच्या रांगा लागत असून, सध्या या ठिकाणी वरली मटका खुलेआम सुरू आहे. या वरली मटका चालवणाऱ्यांना एक प्रकारे पोलिस प्रशासनाकडून मूक संमती मिळत आहे, की काय अशी शंका नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे. त्यामुळे शहरातील सुरू असलेला मटका कायमचा बंद करण्याची मागणी होत आहे. या संपूर्ण प्रकारावरून भाजपने आक्रमक होत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत अवैध व्यवसायिकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजपच्या तक्रारीवर पोलीस काय कारवाई करतात याकडे आता लक्ष लागलेल आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी