रत्नागिरी : एस पी हेगशेट्ये महाविद्यालयात ३० विद्यार्थ्यांचे रक्तदान
रत्नागिरी, 18 जानेवारी, (हिं. स.) : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने युवा सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३० विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. सध्या शासकीय रुग्णालयाच्या र
रत्नागिरी : एस पी शेटे महाविद्यालयात ३० विद्यार्थ्यांचे रक्तदान


रत्नागिरी, 18 जानेवारी, (हिं. स.) : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने युवा सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३० विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.

सध्या शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताची कमतरता जाणवत आहे. तातडीने रक्ताची गरज भासल्यास रुग्णाच्या नातेवाईकांना रक्ताची तसेच रक्तदात्याची शोधाशोध करावी लागत आहे. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतूनच संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले.

यावेळी शासकीय रुग्णालयाकडून शिबिरासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचे स्वागत प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनी केले. यावेळी एस. एम. जोशी फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विद्यार्थी तसेच हॉस्पिटॅलिटी स्टडीजचे (हॉटेल मॅनेजमेंट विभाग) विद्यार्थी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande