नाशिक , 18 जानेवारी (हिं.स.) : अखेर पालकमंत्र्यांची यादी घोषित झाली असून शनिवारी उशिरा घोषित केलेल्या यादीमध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदी भाजपाचे संकट मोचक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे परंतु या यादीमध्ये राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आलेले नाही या यादीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच बिगर आदिवासी व्यक्ती नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत तसेच या मंत्रिमंडळाच्या वैशिष्ट्ये मध्ये मुंबई गडचिरोली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांसाठी सह पालकमंत्री हे पद देखील नियुक्त करण्यात आलेला आहे
विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन झाले आणि सातत्याने पालकमंत्री कोण असेल या विषयावरती चर्चा होत होती पण शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले आहेत पण यामध्ये उत्तर महाराष्ट्रात देखील बदल करण्यात आलेला आहे नंदुरबार जिल्ह्यासाठी फडणवीस सरकारच्या काळात प्रथमच बिगर आदिवासी मंत्री हा पालकमंत्री झालेला आहे या ठिकाणी कृषिमंत्री माणिक कोकाटे हे पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत अहिल्यानगर या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री झालेले आहे तर जळगावला गुलाबराव पाटील यांना पालकमंत्री पद देण्यात आलेले आहे धुळ्याला जयकुमार रावल यांना पालकमंत्री करण्यात आलेले आहेत तर अतिशय महत्त्वाचा असलेला उत्तर महाराष्ट्राचं केंद्र असलेलं आणि सुवर्ण त्रिकोणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभवणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती त्यांची नियुक्ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे या नियुक्त झालेल्या पालकमंत्र्यांमध्ये फडणवीस सरकारने प्रथमच सह पालकमंत्री पद देण्याच्या निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये मुंबईसाठी आशिष शेलार आणि सह पालकमंत्री म्हणून मंगल प्रसाद जोडा यांचे नियुक्ती करण्यात आलेली आहे कोल्हापूरला प्रकाश आंबिटकर पालकमंत्री असतील तर माधुरी मिसळ या सह पालकमंत्री असतील गडचिरोलीमध्ये स्वतः मुख्यमंत्री हे पालकमंत्री असतील तर एडवोकेट अशी जसवाल हे सह पालकमंत्री असतील या सर्व नियुक्त करीत असताना संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बीड जिल्ह्यामध्ये देखील अतिशय महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे त्या ठिकाणचा पालकमंत्री पद हे स्वतः अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याकडे ठेवलेला आहे या ठिकाणी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये रस्सीखेच होती परंतु अलीकडे झालेल्या काही घटनांवरून स्वतः अजित पवार यांनी हे पालकमंत्री पद स्वीकारले आहेत तर पंकजा मुंडे यांना जालना चे पालकमंत्री पद देण्यात आलेले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI