चंद्रपूर : बहेलिया टोळीने  केली होती वाघाची शिकार 
चौकशीत आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली चंद्रपूर, 30 जानेवारी (हिं.स.)। कुख्यात बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित पारधी याने आपल्या साथीदारांच्या मदतीने वाघाची शिकार केल्याचे झाले उघड झाले आहे.यामुळे एकच खळबळ माजली आहे. वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्
चंद्रपूर : बहेलिया टोळीने  केली होती वाघाची शिकार 


चौकशीत आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली

चंद्रपूर, 30 जानेवारी (हिं.स.)। कुख्यात बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित पारधी याने आपल्या साथीदारांच्या मदतीने वाघाची शिकार केल्याचे झाले उघड झाले आहे.यामुळे एकच खळबळ माजली आहे.

वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड याला मध्य चांदा वनविभागाच्या पथकाने शनिवारी रात्री उशिरा अटक केली आहे. त्यानंतर पाच त्याच्या महिला साथीदारांना अटक झाली. त्यांना न्यायालयाने सहा दिवसांची वन कोठडी दिली असून आरोपीकडून गुन्ह्याची माहिती घेतली जात आहे. दरम्यान आरोपीचा २०१३ पासून व्याघ्र गुन्ह्यात सहभाग दिसला आहे. मध्य प्रदेशातील या बहेलिया टोळीने २०१३ ते २०१५ या काळात महाराष्ट्र व मध्य प्रदेशात सुमारे २० हून जास्त वाघांच्या शिकारी केल्या होत्या. आता अजित पारधी याने आपल्या साथीदारांच्या मदतीने वाघाची शिकार केल्याचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.केलेल्या कबुली गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, सापळे व वाघाचे अवयव लपवून ठेवली जागा आरोपीने दाखवली. त्यानंतर साठवणीच्या जागेचा शोध घेतला असता जमिनीत पुरून ठेवलेली वाघ शिकार करण्याचा सापळा व इतर खड्ड्यात वाघाच्या शरीराचे काही अवयव घटनास्थळावरून हस्तगत करण्यात आले आहेत. सर्व अवयवांची फॉरेन्सिकची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेली आहेत. सदर शिकार त्यांनी नेमकी केव्हा केली आणि आणखी शिकारीची प्रकरणे आहेत का याचा शोध वनविभाग घेत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande