जळगावात ट्रक विक्रीतून तरूणाला साडेअकरा लाखात गंडवले
जळगाव, , 6 जानेवारी (हिं.स.) जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात राहणाऱ्या एका तरूणाला ट्रक विक्रीच्या व्यवहारातून सुमारे ११ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या दोघांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
जळगावात ट्रक विक्रीतून तरूणाला साडेअकरा लाखात गंडवले


जळगाव, , 6 जानेवारी (हिं.स.) जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात राहणाऱ्या एका तरूणाला ट्रक विक्रीच्या व्यवहारातून सुमारे ११ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या दोघांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशांत विजय पटाईत (३५, रा. देवराम नगर, जळगाव) हा तरूण आपल्या परिवारासह राहतो. त्यांचा मालकीचा ट्रक क्रमांक (एमएच ०४ जीसी ०८५९) विक्रीसाठी संशयित आरोपी भगवान उर्फ वाल्मिक भिवसन चौधरी आणि दगडू बंडू पाटील दोन्ही राहणार धुळे यांनी निशांत पटाईत यांचा विश्वास संपादन करून १४ ऑक्टोबर रोजी नोटरी करारनामा केला व पैसे न देता ट्रक ताब्यात घेतला.

परंतू दोघांना करारनामा प्रमाणे व्यवहार पुर्ण न करता त्यांची फसवणूक केली आहे. हा प्रकार घडल्यानंतर निशांत पटाईत यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार भगवान उर्फ वाल्मिक भिवसन चौधरी आणि दगडू बंडू पाटील दोन्ही राहणार धुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप बोरूडे हे करीत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande