वाहन हस्तांतरणासाठी 400 रुपये घेताना अटक
नागपूर,06 जानेवारी (हिं.स.) : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकऱ्याला 400 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केलीय. अश्फाक मेहमूद अहमद असे या लाचखोर धिकाऱ्याचे नाव असून 3 वाहनांच्या जलद हस्तांतरणासाठी त्याने लाचेची मागणी केली होती.
नागपूरच्या भालदरपुरा येथील व्यक्तीने लाचखोर अधिकाऱ्याची तक्रार केली होती. अश्फाक मेहमूद अहमद यांच्या व्यतिरिक्त मिर्झा असराग अकरम बेग हाही यात सहआरोपी आहे. यासंदर्भात एसीबीने दिलेल्या माहितीनुसार एआरटीओ अशफाक मेहमूद अहमद यांनी तक्रारदाराच्या बहिणीच्या नावाने दुचाकी वाहन तसेच तक्रारदाराच्या परिचयाचे 2 व्यक्तींच्या नावावर एक दुचाकी व एक चारचाकी वाहन असे एकूण 3 वाहनाच्या हस्तांतरणात (ट्रान्स्फर ऑफ ओनरशिप) कोणतीही त्रुटी न काढता लवकर काम करून देण्याकरीता 400 रूपयांची लाच मागितली. अशफाक मेहमूद अहमद यांनी मिर्झा असराग अकरम बेग याच्या मार्फत आज, सोमवारी लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच लाच म्हणून स्वीकारलेले 400 रुपये जप्त करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी