जळगावात गावठी कट्ट्यासह दोन तरुण जेरबंद
जळगाव, 6 जानेवारी (हिं.स.)भडगाव परिसरात आपली दहशत माजविण्यासाठी भडगाव शहरातील २४ वर्षीय व कजगाव येथील २७ वर्षीय तरुणांजवळ गावठी कट्टा सापडल्याने परीसरात खळबळ माजली. या दोन्ही तरुणांना ताब्यात घेत मुद्देमाल जमा करत भडगाव पोलिस स्टेशनला आर्म ॲक्ट प्रम
जळगावात गावठी कट्ट्यासह दोन तरुण जेरबंद


जळगाव, 6 जानेवारी (हिं.स.)भडगाव परिसरात आपली दहशत माजविण्यासाठी भडगाव शहरातील २४ वर्षीय व कजगाव येथील २७ वर्षीय तरुणांजवळ गावठी कट्टा सापडल्याने परीसरात खळबळ माजली. या दोन्ही तरुणांना ताब्यात घेत मुद्देमाल जमा करत भडगाव पोलिस स्टेशनला आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक शेखर डोमाळे, पो.कॉ.ईश्वर पाटील, सागर पाटील व पथकातील कर्मचारी यांनी मोठ्या शिताफीने केली.

पो.कॉ.सागर गुलाब पाटील नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी आकाश झुंबर कांबळे (२४, रा.वरची बर्डी, यशवंतनगर, आयमरीमाता मंदिराजवळ भडगाव) आणि दुसरा आरोपी शुभम भास्कर जौणे (२७, रा. महादेव मंदिराजवळ कजगाव रेल्वे स्टेशन शेजारी, कजगाव ता.भडगाव) यांच्या जवळ २५,००० रू. किमतीची एक गावठी बानावटीची पिस्टल तीस लोखंडी मॅग्झिन असलेली समोर गोल बैरल व मुठीत बाजूस तपकिरी रंगाची प्लेट व त्यावर चांदणीची आकाराची नक्षी असलेली गावठी कट्टा आढळला. शुभम भास्कर जौणे याने परिसरात दहशत माजवत गावठी बनावटीचे पिस्टल विना परवाना बाळगत सदरचे पिस्टल हे विना परवाना आकाश झुंबर कांबळे याला आर्थिक फायद्याकरीत विकले. याप्रकरणी वरील दोघा आरोपींविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशन गु.र.न. ०६/२०२५ शस्त्र अधि. कायदा कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश मस्के हे करीत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande