येवला, 5 जानेवारी (हिं.स.)- येवला येथे बनावट देशी दारूचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड दाखवून उद ध्वस्त केला असून 17 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे विशेष म्हणजे पोलिसांचा लोगो लावून बिनबोट देशी दारूचे वाहतूक ही केली जात होती असे देखील या छाप्यानंतर समोर आले आहे. यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तसेच संबंधित यंत्रणांचे किती वचक होता हे यावरून समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , येवला तालुक्यात आडगाव रेपाळ येथील एका शेतामध्ये बनावट रॉकेट नावाची देशी दारू बनवण्याचा कारखान्यावर उत्पादन शुल्क विभाग नाशिक कळवण सटाणा व येवला येथील पथकाने धाड टाकली आहे.
या धाडी मध्ये देशी दारू बनवण्याचे साहित्य सिलिंग मशीन ,रिकाम्या देशी, दारूच्या बाटल्या, स्पिरिटचे प्लास्टिक टॅंक, लेबल तसेच महाराष्ट्र पोलीस लोगो असलेले बुलेरो वाहन असा एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
येवल्यात या कारवाई मुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपी रामभाऊ निकम, राहुल डगळे, असे दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले असून तिसरा एक संशयित आरोपी फरार आहे. अशी माहिती तपासी अधिकारी उत्पादन शुल्क निरीक्षक अमोद भडांगे यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI