अमरावती, 9 जानेवारी (हिं.स.)।
महानगर पालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या नावाने फेसबुकवर बनावट आयडी तयार करण्यात आली आहे. या आयडीद्वारे काहींना पैसे मागण्यांत आल्याचेही पुढे आले असले तरी मनपा आयुक्तांना याबाबत कोणतीही माहिती नव्हती. ज्यावेळी त्यांना कळाले, त्यावेळी - त्यांना धक्का बसला. त्यांनी लगेच सायबर पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली.
प्रथम कलंत्रे यांच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. मनपा आयुक्तांचे नाव बघून कोणीही ती रिक्वेस्ट सहज स्विकार करतो. रिक्वेस्ट स्विकार झाल्यानंतर ज्याने ती पाठवली त्याला समाधान वाटते. काही वेळाने मनपा आयुक्तांकडून इंग्रजीत नमस्कार तुम्ही कसे आहात, असा संदेश पाठवला जातो. जर त्याला प्रतिसाद दिला तर फेक आयडीवरून काही कारणे सांगून पैसे मागितले जात आहेत. याबाबत मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांना विचारणा केली असता, त्यांनी मला जेव्हा बनावट आयडीबाबत कळाले तेव्हा मी पोलिसांकडे तक्रार केल्याचे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी