पुणे, 9 जानेवारी (हिं.स.)। पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गेल्या वर्षी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर, त्याची गँग काहीही विस्कळीत झाली असली तर त्याच्या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न त्याच्या गटातील सदस्यांकडून होत असल्याचं सातत्याने समोर येत आहे.
येथील गुंड शरद मोहोळ याची 5 जानेवारी 2024 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कोथरूड येथील सुतारदरा भागात शरद मोहोळ याच्या घराजवळच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले असून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्याच आठवड्यात शरद मोहोळ टोळीतील दोघांना अटक केली होती. आता, आणखी एका सदस्याला पिस्तुलसह अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून संबंधित आरोपीची सखोल चौकशी सुरू असून त्याने जवळ बागळलेले पिस्तुल कोणत्या उद्देशाने ठेवले होते, याचाही तपास घेतला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु