रेल्वेमध्ये विष पाजून हत्या करणाऱ्या अटक
नाशिक, 9 जानेवारी (हिं.स.) धावत्या रेल्वेत मावस भावाला कोल्ड्रिंकमधून विषारी औषध पाजून हत्या करणाऱ्या दोघांपैकी एकाला नाशिकरोड लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकाचा शोध सुरू आहे. याबाबत पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक एस. एस. बनकर यांन
रेल्वेमध्ये विष पाजून हत्या करणाऱ्या अटक


नाशिक, 9 जानेवारी (हिं.स.) धावत्या रेल्वेत मावस भावाला कोल्ड्रिंकमधून विषारी औषध पाजून हत्या करणाऱ्या दोघांपैकी एकाला नाशिकरोड लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकाचा शोध सुरू आहे. याबाबत पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक एस. एस. बनकर यांनी सांगितले की, दि. २४ जून २०२३ रोजी मंगला एक्सप्रेसने जितेंद्र बनवारी यादव (वय २०) व व त्याचे दोन मावस भाऊ नाशिकरोड ते ग्वाल्हेर असा जनरल डब्यातून प्रवास करीत होते. रेल्वेगाडी झाशी येथे गेल्यानंतर जितेंद्र यादव याचा मृतदेह आढळला. वैद्यकीय तपासणी व त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जितेंद्र यादव याचा मृत्यू कोल्ड्रिंकमध्ये विषारी औषध पाजून झाला असल्याचे निष्पन्न झाले. घटनेचे क्षेत्र नाशिकरोड असल्याने झाशी पोलिसांकडून तपासाकरिता हा गुन्हा नाशिकरोड लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्या अनुषंगाने तपास सुरू असताना मयत त्याचे वडील व त्याच्याबरोबर असलेले दोन मावस भाऊ यांच्या मोबाईलचे रेकॉर्ड तपासून लोहमार्ग पोलिसांनी तुंडा उर्फ रामहेत नरेश सिंग यादव (वय २३) यास ताब्यात घेतले तर त्यांचा दुसरा फरार असलेल्या भाऊ संजू राजाराम यादव याचा शोध सुरु आहे. ही कारवाई लोहमार्ग पोलीस अधीक्षक स्वाती भोर, लोहमार्ग उपविभागीय पोलीस अधिकारी एस. एम. लोहकरे, प्रभारी निरीक्षक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष उफाडे पाटील, धनंजय नाईक, शैलेश पाटील, राज बच्छाव यांनी यशस्वीरीत्या पार पडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande