अमरावती जिल्हा रुग्णालयात दुचाकी चोरांचा हैदोस; सुरक्षा वाढवण्याची केली मागणी
अमरावती, 9 जानेवारी (हिं.स.)येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून दुचाकी वाहनांच्या चोरीत वाढ झाली आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसह आता रुग्णालयीन कर्मचा-यांनाही या चोरीचा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर सफाई मजदूर काँग्रेसचे किशोर धामणे व इतर कर्मचा
जिल्हा रुग्णालयातून दुचाकी चोरांचा हेदोस पोलिस आयुक्तांकडे सुरक्षा वाढवण्याची केली मागणी


अमरावती, 9 जानेवारी (हिं.स.)येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून दुचाकी वाहनांच्या चोरीत वाढ झाली आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसह आता रुग्णालयीन कर्मचा-यांनाही या चोरीचा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर सफाई मजदूर काँग्रेसचे किशोर धामणे व इतर कर्मचाऱ्यांनी पोलिस आयुक्तांना (सीपी) साकडे घातले असून याकडे त्यांचे लक्ष वेधले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात अमरावती जिल्ह्याच नव्हे तर शेजारच्या मध्यप्रदेश या राज्यातूनही रुग्ण येत असतात. त्यामुळे येथे नेहमीच गर्दी असते. मुळात गर्दी असते म्हणून तेथे वाहनांची संख्याही अधिक असते. आतापर्यंत या ठिकाणाहून काही नागरिकांची वाहने चोरीस गेली. आता चोरांची मजल कर्मचाऱ्यांच्या वाहनांची चोरी करण्यापर्यंत गेली आहे. शिकाऊ कर्मचारी, शिकाऊ डॉक्टर्स आणि सफाई कर्मचाऱ्यांचीही वाहने चोरीस गेली आहेत. त्यामुळे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे जिल्हा महासचिव किशोर घामने यांच्या नेतृत्वात अलिकडेच एका प्रतिनिधीमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्या पुढ्यात हा मुद्दा मांडला.जिल्हा सामान्य रुग्णालयात सिटी कोतवाली पोलिसांची चौकी आहे. येथे पोलिस हजर असतात. परंतु तरीही चोर जुमानत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे नियमित कामाव्यतिरिक्त एक-दोन शिपायांवर गस्त घालण्याची जबाबदारी टाकल्यास चोरांवर क्चक निर्माण होईल आणि वाहन चोरी थांबेल, असे निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे. शिवाय चोरीस गेलेली वाहने शोधून देण्यास मदत करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. आता पोलिस आयुक्त या निवेदनाच्या आधारे काय कारवाई करतात, याकडे लक्ष वेधले आहे.

स्वतंत्र वाहनतळाची मागणी

रुग्णालयात रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी सशुल्क सेवेवर आधारित वाहनतळ आहे. मात्र कर्मचाऱ्यांची वाहने उभी ठेवण्यासाठी स्वतंत्र वाहनतळ नाही. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने स्वतंत्र वाहनतळ उभे करावे. पोलिस आयुक्तांना निवेदन देत असतानाच आम्ही जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनाही निवेदन देत ही मागणी रेटली आहे, असे अ.भा. सफाई मजदूर काँग्रेसचे जिल्हा महासचिव किशोर धामणे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande