अमरावती, 9 जानेवारी (हिं.स.)जिल्ह्यात एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी फुस लावून पळवून नेल्या प्रकरणी एकाच दिवशी अंजनगाव सुर्जी व मंगरूळ दस्तगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मात्र पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मुलींबाबत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १७ वर्षीय युवती २६ डिसेंबर रोजी कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती आढळून आली नाही.त्यामुळे पालकांनी ७ जानेवारी रोजी अंजनगाव पोलिसांत तक्रार दाखल करीत अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याचा अंदाज व्यक्त करीत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अशीच दुसरी घटना मंगरूळ दस्तगीर पोलिस ठाण्यांतर्गत घडली. घटनेच्या वेळी अल्पवयीन युवती ही रात्रीच्या वेळी नेहमीप्रमाणे तिच्या एक नातेवाईकाकडे झोपायला गेली होती. दरम्यान ती घरी पोहोचली नसल्याची माहिती नातेवाईकांनी तिच्या कुटुंबियांना दिली. नातेवाईक व कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती कुठेही आढळून आली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी