दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचा बांगलादेशवर ८१ धावांनी विजय
अबूधाबी, 12 ऑक्टोबर (हिं.स.)अफगाणिस्तान क्रिकेट संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा ८१ धावांनी पराभव केला. या विजयास तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत अफगाणिस्तानने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. अबूधाबी येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या साम
राशिद खान


अबूधाबी, 12 ऑक्टोबर (हिं.स.)अफगाणिस्तान क्रिकेट संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा ८१ धावांनी पराभव केला. या विजयास तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत अफगाणिस्तानने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

अबूधाबी येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ४४.५ षटकांत १९० धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ २८.३ षटकांत १०९ धावांवर सर्वबाद झाला. अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झद्रानने ९५ धावा केल्या आणि त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना १४ ऑक्टोबर रोजी अबूधाबी येथे खेळला जाणार आहे.

पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानने सुरुवात संथ केली होती. पण सलामीवीर इब्राहिम झद्रानने संघाची धुरा सांभाळली. त्याने १४० चेंडूंत ९५ धावांची शानदार खेळी केली. मोहम्मद नबी आणि एएम गझनफर यांनीही प्रत्येकी २२ धावांचे योगदान दिले. तथापि, उर्वरित फलंदाज अपयशी ठरले आणि संघ ४४.५ षटकांत १९० धावांतच बाद झाला.

बांगलादेशकडून मेहिद हसन मिराज सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने १० षटकांत ४२ धावांत तीन विकेट्स घेतल्या. रिशाद हुसेन आणि तन्झिम हसन सकीब यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तन्वीर इस्लामने एक बळी घेतला. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ २८.३ षटकांत १०९ धावांतच सर्वबाद झाला. तौहिद हृदयॉय (२४) आणि सैफ हसन (२२) यांनी सर्वोत्तम प्रयत्न केले. पण इतर फलंदाज फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. एकाही फलंदाजाला २५ धावांचा टप्पा पार करता आला नाही.

अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने बांगलादेशी फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात चांगलेच अडकवले. राशिदने ८.३ षटकांत फक्त १७ धावांत पाच विकेट्स घेतल्या. तर अझमतुल्लाह उमरझाईने तीन फलंदाजांना बाद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande