एपीके फाइल आटो डाउनलोड झाल्याने बँक खात्यातील ४,६४,४३९ रु. लंपास
जळगाव, 15 ऑक्टोबर (हिं.स.) जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. प्लॉट खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटच्या व्हॉट्सअॅपवर पाठवलेली एपीके फाइल आटो डाउनलोड झाल्याने सेकंदात बँक खात्यातील ४,६४,४३९ रु. लंपास झाले. याबाबत जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाख
एपीके फाइल आटो डाउनलोड झाल्याने बँक खात्यातील ४,६४,४३९ रु. लंपास


जळगाव, 15 ऑक्टोबर (हिं.स.) जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. प्लॉट खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटच्या व्हॉट्सअॅपवर पाठवलेली एपीके फाइल आटो डाउनलोड झाल्याने सेकंदात बँक खात्यातील ४,६४,४३९ रु. लंपास झाले. याबाबत जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नीलेश हेमराज सराफ (वय ४९, रा. अजय कॉलनी रिंगरोड) हे प्लॉट खरेदी-विक्रीचे एजंट आहेत. त्यांच्या घरातील वॉशिंग मशीन खराब झाल्याने तक्रार करण्यासाठी त्यांनी गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधला होता. यावेळी त्यांच्या व्हाॅटस्ॲपवर एका फोन नंबरवरून कस्टमर्स सर्व्हिस सपोर्ट ही एपीके फाइल आली. त्यावेळी त्यांच्या व्हॉटस्ॲपची सेटिंग ‘ऑटो डाऊनलोड’वर होती. त्यामुळे ही फाइल ॲटोमॅटिक डाऊनलोड झाली. आणि खात्यातून ४ लाख ६४, ४३९ रुपये गायब झाले. फाइल डाऊनलोड होताच फोनचा त्वरित ॲक्सेस मिळतो.

सराफ यांच्या फोनमध्ये एपीके फाइल डाऊनलोड होताच अज्ञातने त्यांच्या फोनचा ॲक्सेस मिळवला. त्यामुळे त्याला सर्व खासगी माहिती घेणे सहज शक्य झाले. खात्यातून पैसे काढले जात असल्याचे लक्षात येताच सराफ हे बँकेत गेले व खाते होल्ड केले. त्यामुळे उर्वरित रक्कम स्थगित या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाइल वायफायवर असताना ‘ऑटो डाउनलोड’ सेटिंग ठेवल्याने हा प्रकार घडला असून, सर्वच मोबाइल ग्राहकांनी आपल्या मोबइलचे सेटिंग तपासणे गरजेचे झाले आहे. दरम्यान सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच वायफायवर ‘ऑटो डाऊनलोड’ सेटिंग टाळा जेणेकरून केव्हा कोणती फाइल येईल व ती डाऊनलोड झाल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते असे ते म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande