शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे सांगून १३ लाखांना गंडवले
जळगाव, 15 ऑक्टोबर (हिं.स.) येथील एका खासगी नोकरदाराला सोशल मीडियावर शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देण्याच्या भूलथापा देत, सायबर ठगांनी १२ लाख ८२ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस स्टेशनमध्ये
शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे सांगून १३ लाखांना गंडवले


जळगाव, 15 ऑक्टोबर (हिं.स.) येथील एका खासगी नोकरदाराला सोशल मीडियावर शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देण्याच्या भूलथापा देत, सायबर ठगांनी १२ लाख ८२ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी ढोमण माळी (वय ३५, रा. गुड्डु राजा नगर, जळगाव) हे खासगी कंपनीत रिलेशनशीप मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. १४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत ही फसवणूक झाली. माळी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम खात्यावर शेअर ट्रेडिंगचे रिल्सचे व्हिडिओ पाहून एका अनोळखी पेजला फॉलो केले होते. त्यानंतर, त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले. या ग्रुपची अॅडमिन नेहा अय्यर आणि सदस्य प्राजक्त सामंत यांनी माळी यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यावर विश्वास ठेवून केलेल्या गुंतवणूकीत फसगत झाली असल्याचे माळी यांच्या नंतर लक्षात आले. माळी यांना एक अॅप डाऊनलोड करण्याची लिंक पाठवली. एका अनोळखी व्यक्त्तीने त्यांना हे अॅप वापरण्यास सांगितले.

माळी यांनी हे अॅप डाऊनलोड करून त्यामध्ये आपला मोबाईल नंबर, पासवर्ड आणि इन्व्हिटेशन कोड टाकला, कागदपत्रांचे फोटो अपलोड करीत ५ हजार रुपये गुंतवणूक केली. त्यावर १०१ रुपये नफा देत विश्वास संपादन केला. यानंतर स्टॉक आणि आयपीओ खरेदी करण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये माळी यांच्याकडून १२ लाख ८२ हजार इतकी ऑनलाईन स्वीकारली. गुंतवलेली रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याने माळी यांनी गुन्हा दाखल केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande