युद्धबंदी दरम्यान हमासने चुकीचा मृतदेह परत केला
जेरुसलेम, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। इस्त्रायलच्या लष्कराने असा दावा केला की, मंगळवारी हमासने युद्धविराम कराराअंतर्गत परत केलेल्या चार मृतदेहांपैकी एक मृतदेह ओलीस ठेवलेल्याचा नाही. लष्कराने सांगितले की, रात्रभर चाललेल्या फॉरेन्सिक तपासणीत हे निष्पन्न झाल
युद्धबंदी दरम्यान हमासने चुकीचा मृतदेह परत केला


जेरुसलेम, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। इस्त्रायलच्या लष्कराने असा दावा केला की, मंगळवारी हमासने युद्धविराम कराराअंतर्गत परत केलेल्या चार मृतदेहांपैकी एक मृतदेह ओलीस ठेवलेल्याचा नाही. लष्कराने सांगितले की, रात्रभर चाललेल्या फॉरेन्सिक तपासणीत हे निष्पन्न झाले की, एक मृतदेह कोणत्याही ओलीस ठेवलेल्याशी जुळत नाही. इस्त्रायली लष्कराने इशारा दिला आहे की, हमासने सर्व मृत ओलीस ठेवलेल्यांचे मृतदेह परत करण्यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत.

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी बुधवारी सांगितले की, हमासने युद्धविराम कराराच्या अटींचं पालन केलं पाहिजे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं, “आपला अखेरचा मृत बंदक परत येईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.” करारानुसार, सोमवारीपर्यंत सर्व जिवंत व मृत बंदकांना परतवणे आवश्यक होते. जर वेळेत असं झालं नसतं, तर हमासने मृत बंदकांबद्दल माहिती शेअर करणे आणि ते शक्य तितक्या लवकर परत करणे बंधनकारक होतं.

हमासचा प्रवक्ता हाजेम कासेम याने बुधवारी सांगितले की त्यांचा गट करारानुसार मृतदेह परत करण्यावर काम करत आहे, पण इस्त्रायलने मंगळवारी पूर्व गाझा सिटी आणि रफामध्ये गोळीबार करून युद्धविराम तोडले. इस्त्रायलचे संरक्षणमंत्री इजरायल काट्ज यांनी म्हटले की लष्कर केवळ ठरवून दिलेल्या सीमांवरच तैनात आहे आणि जर कोणीही त्या सीमेच्या जवळ आले, तर त्याला लक्ष्य केले जाईल.

हमासने सोमवारपासून आतापर्यंत एकूण २० जिवंत बंधक आणि ८ मृतदेह परत केले आहेत, ज्यामध्ये ६ इस्त्रायली, १ नेपाळी आणि १ अज्ञात व्यक्तीचा समावेश आहे. ही देवाण-घेवाण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर झालेल्या युद्धविराम कराराअंतर्गत पार पडली. दुसरीकडे, गाझामधील एका रुग्णालयाने सांगितले आहे की त्यांना इस्त्रायलकडून परतवलेले ४५ पॅलेस्टिनी मृतदेह प्राप्त झाले आहेत.

मंगळवारी परतवलेल्या दोन बंदकांच्या मृतदेहांचे बुधवारी तेल अवीवजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी इस्त्रायलने २,००० पॅलेस्टिनी कैद्यांना आणि बंदींना मुक्त केले होते, ज्यामुळे दोन्ही बाजूंना आनंद आणि दिलासा जाणवला. मात्र, मृत बंधकांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली की २८ मृतांपैकी फक्त ८ मृतदेहच परत आले आहेत. मंगळवार रात्री परतवलेल्या चार मृतदेहांपैकी तीन मृतांची ओळख उरिएल बारुख, तामिर निमरोडी आणि एतान लेवी अशी झाली आहे. बारुखला ७ ऑक्टोबर २०२३ रोजी नोवा म्युझिक फेस्टिव्हल दरम्यान हमासने अपहरण केले होते, तर निमरोडीला एरेज बॉर्डर क्रॉसिंगवरून उचलण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande