नांदेडमध्ये पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या
नांदेड, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने नदीत फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना किनवटमध्ये उघडकीस आली आहे विनोद भगत असे यातील मृतकाचे नाव असून त्याची पत्नी प्रियंकाचे शेख रफीक या युवकाशी अनैतिक
संग्रहित


नांदेड, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने नदीत फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना किनवटमध्ये उघडकीस आली आहे विनोद भगत असे यातील मृतकाचे नाव असून त्याची पत्नी प्रियंकाचे शेख रफीक या युवकाशी अनैतिक संबंध होते.या संबंधात पती अडथळा ठरत असल्याने या दोघांनी मिळून दारूच्या नशेत असलेल्या विनोदला पैनगंगा नदीत फेकले.

त्यानंतर पत्नी प्रियंकाने नवरा बेपत्ता झाल्याचा कांगावा केला. मात्र मृतकाच्या बहिणीने जागरूकता दाखवल्याने पोलीस तपासात हत्येचा हा गुन्हा आता उघड झाला. या दोन्ही आरोपीना किनवट पोलिसांनी अटक केली. यातील विनोदचा मृतदेह जवळच्या पोफाळी शिवारात आढळला होता.

दारूच्या नशेत असलेल्या विनोद भगत यांना घेऊन दोघेही मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील खरबी पुलावर गेले. तिथे त्यांनी विनोद भगत यांना पुलावरून जिवंत खाली फेकून दिले. या क्रूर हत्येनंतर मयताची पत्नी प्रियंका हिने स्वतः किनवट पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र, मयताच्या बहिणींनी भावाचा घातपात झाल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला, आणि हाच धागा किनवट पोलिसांना सत्य उघड करण्यासाठी महत्त्वाचा ठरला.

जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान, फिर्यादी असलेल्या पत्नीच्या मोबाईलमधील एका विशिष्ट क्रमांकावर वारंवार झालेले कॉल पोलिसांना संशयास्पद वाटले. त्या क्रमांकाच्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली आणि खुनाचे भयावह सत्य उघड झाले.

पत्नी आणि प्रियकर ताब्यातपोलिसांनी तांब्याची अंगठी आणि कपड्यांवरून पोफळी शिवारात सापडलेल्या प्रेताची ओळख पटवली.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande