सोलापूर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।शहरातील १३१ ठेवीदारांना चिप्पा दांपत्याने एक कोटी ६९ लाख १९ हजार रुपयांना गंडा घातला होता. लोक पैसे मागू लागले आणि पोलिसांत गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर १५ महिन्यांपूर्वी सोलापूरमधून ते पळून गेले होते. त्या भिशी चालक पती-पत्नींना सोलापूर शहर पोलिसांनी ९०० किमी दूरवरील आंध्रप्रदेशातील लक्खावरम गावातून जेरबंद केले आहे.१ नोव्हेंबर २०२० ते ३० एप्रिल २०२४ दरम्यान भिशी चालवून विश्वास संपादन केला. त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर जास्तीचे व्याज मिळवून देतो म्हणून आमिष दाखविले. श्री ओम साई फायनान्स सुरू करून त्याच्या माध्यमातून १३१ ठेवीदारांकडून दोन कोटी ६९ लाख १९ हजार रुपये घेतले. काही महिन्यांपर्यंत ठेवीदारांना नियमित व्याजाचा परतावा दिला, पण कालांतराने तो परतावा बंद केला. त्यावेळी काहींनी मुद्दल मागितले आणि चिप्पा पती-पत्नींनी पैसे दिले नाहीत. त्यावरून शिवाजी लक्ष्मण आवार (रा. साईबाबा चौक, सोलापूर) यांनी जेलरोड पोलिसांत फिर्याद दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड