अकोला, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।
भारत सरकारच्या ‘FSSAI’ आणि ‘FDA’ या खाद्यपदार्थांचे प्रमाणीकरण करणाऱ्या शासकीय संस्था अस्तित्वात असतांनाही ‘हलाल सर्टिफिकेशन’च्या माध्यमातून समांतर इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदु राष्ट्र समन्वय समिती, हिंदु जनजागृती समिती आणि हलाल सक्तीविरोधी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हलाल मुक्त दिवाळी’ अभियान राबविण्याचा निर्धार करण्यात आला.
या अभियानाच्या अनुषंगाने श्री शिवचरण मंदिर, जुने शहर, अकोला येथे हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री प्रमोद अग्निहोत्री यांच्या पुढाकाराने बैठक आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री योगेश अग्रवाल यांनी हिंदू समाजाची सद्यस्थिती, इस्लामद्वारे राबवली जात असलेली हलाल अर्थव्यवस्था आणि तिच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम यावर प्रकाश टाकला.
हिंदु राष्ट्र समन्वय समिती, अकोलाचे संयोजक श्री उदय महा यांनी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने राष्ट्ररक्षणासाठी राबवले जाणारे विविध उपक्रम यांची माहिती दिली. त्यांनी उपस्थितांना या अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले.
शिवचरण मंदिराचे अध्यक्ष श्री केशवराव मोहरील यांनीही आपल्या भाषणात सांगितले की, “हिंदू म्हणून राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे आणि हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे या दृष्टीने चाललेले प्रयत्न स्तुत्य आहेत.
या बैठकीला नगरसेविका श्रीमती मंजूताई शेळके, मंदिराचे रमेश इंगळे, तसेच अनेक धर्मप्रेमी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. प्रमोद अग्निहोत्री यांनी या बैठकीचे सूत्रसंचालन केले.
बैठकीच्या शेवटी उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे “हलाल मुक्त दिवाळी” साजरी करण्याची प्रतिज्ञा घेतली आणि बैठकीच्या आयोजनाविषयी समाधान व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे