ग्रामपंचायतीमुळे शासनाच्या योजना ग्रामीण भागात पोहोचतात – आदिती तटकरे
रायगड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। केंद्र व राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यात ग्रामपंचायतीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार आणि गु
ग्रामपंचायतीमुळे शासनाच्या योजना ग्रामीण भागात पोहोचतात – आदिती तटकरे


रायगड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।

केंद्र व राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यात ग्रामपंचायतीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार आणि गुणगौरव समारंभ क्षात्रौय समाज सभागृह, कुरूळ येथे उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, प्रकल्प संचालक प्रियदर्शन मोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. तब्बल नऊ वर्षांनी या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले असून, एकूण १२५ ग्रामसेवकांचा सन्मान करण्यात आला.

मंत्री तटकरे यांनी त्यांच्या भाषणात ग्रामपंचायत ग्रामीण विकासाचा पाया असल्याचे स्पष्ट केले. ग्रामसेवक म्हणजे ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवणारा दुवा आहे. त्यांनी नमूद केले की, सध्या अनेक ग्रामसेवकांकडे एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा अतिरिक्त भार असला तरी ते प्रामाणिकपणे काम करत आहेत. पुरस्कार मिळालेल्या ग्रामसेवकांची जबाबदारी आता आणखी वाढली असून, त्यांनी जोमाने काम करावे असे आवाहन मंत्री तटकरे यांनी केले.

आमदार महेंद्र दळवी म्हणाले की ग्रामसेवक प्रशासन आणि नागरिकांमध्ये महत्त्वाचा दुवा आहेत आणि त्यांचा योग्य सन्मान आवश्यक आहे. त्यांनी रायगड जिल्हा परिषद आणि पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.

“ग्रामसभा म्हंटली की गावकरी हजेरी लावतात कारण ग्रामपंचायत आणि त्याचे शिल्पकार म्हणजे ग्रामसेवक हेच खरे केंद्रबिंदू आहेत. मोठ्या गावात ग्रामसेवकाचे काम अधिक आव्हानात्मक असते. आदर्श ग्रामसेवक म्हणून गौरव ही जबाबदारी वाढवणारी बाब आहे,” असे तटकरे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande