अकोला, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आढाऊ, चिखली,पातोडा, तारुबांदा शहानुर गावांमध्ये निलेश देव मित्र मंडळाच्या 'दिवाळी भेट ' उपक्रमातून गोरगरिबांना कपडे व इतर वस्तू आज पाठविल्या गेल्या. या वेळी सामर्थ्य फाउंडेशन विनोद देव,प्रबोध देशपांडे, ब्राह्मण व्यापारी संघ अध्यक्ष आशिष अमीन, श्रीकांत चाळीसगाकर, लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन गोल्ड निलेश पवार यांची उपस्थिती होती.
माजी नगरसेविका अॅड.धनश्री देव अभ्यंकर यांच्या पाचव्या स्मृती दिनी त्यांना अभिवादन करण्यात आले. सामाजिक कार्यामध्ये नेहमी विविध लोकोपयोगी समाज हिताचे आगळेवेगळे उपक्रम राबविणाNया अॅड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प द्वारा संचालित निलेश देव मित्र मंडळाने 'जुने कपडे संकलन शिबिर' आयोजित करून या शिबिरात प्राप्त झालेले कपडे व फराळ, भेट वस्तू आज मेळघाटातील आढाऊ, चिखली, तारुबांदा गावांमधील गोरगरिबांसाठी नेण्यात आले. हे कपडे मेळघाटात पोहोचविण्यासाठी सकाळी स्थानिक सातव चौकातून दोन वाहनांसह संकल्प रथ रवाना करण्यात आले. यावेळी सार्मथ्य फाउंडेशन अध्यक्ष विनोद देव, प्रबोध देशपांडे, श्रीराम देशपांडे, डॉ गजानन वाघोडे सह सार्मथ्य फाउंडेशन संपूर्ण टिम, लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन चे अध्यक्ष निलेश पवार,, , सोमेश्वर मोटे, निलेश जी हाडोळे , ब्राह्मण व्यापारी संघ अध्यक्ष आशिष अमीन, सतिश खोडवे , यांची उपस्थिती होती. निलेश देव मित्र मंडळाने चिखलदरा तालुक्यातील गावात जावून गावातील प्रत्येकाला घरात कपडे, फराळ, फटाके, चपला जोड वाटप केले. यावेळी निलेश देव, जयंत सरदेशपांडे, दिलीप काका देशपांडे, रामहरी डांगे,अजय शास्ती,शरद जोशी, राजु गुन्नलवार, श्रीराम उमरेकर, नितीन गव्हारे,,राजू कनोजिया, अजय शास्त्री, राजु सोनी, विजय वाघ, , रविंद्र मेश्राम,, भास्कर बैतवार, नरेंद्र परदेसी, रमेश खिलोसिया, आशु यादव, शशि हिवरखेडकर, प्रदिप बांधोकार, दत्ता भाबेरे,कीरण मारवाल, विनोद भाबेरे, प्रसाद देशपांडे, अनिल कुकलवार,विजय भुजबळ काका,स्वराज बिलबिले हरिशचंद्र राठोड, प्रसाद देशपांडे, अनिरुद्ध भाजीपाले,पियुष पाटील, गिरीश गांधी,सुमेध लोखंडे, गिरीश लोखंडे,रुपेश ठाकरे,कुष्णा घाटोळे,सार्थक देव, मयुरेश पवार,संजय वडारकर, कार्तिक वडारकर, निलेश दुधलम, सह अनेक सदस्य उपस्थित होते. या प्रशंसनीय उपक्रमासाठी मेळघाटातील गोरगरिबांनी निलेश देव यांचे आभार व्यक्त केले. तर या उपक्रमासाठी अकोल्यातील मान्यवरांकडून निलेश देव यांचे कौतुक होत आहे.
माजी नगरसेविका अॅड. धनश्री देव यांच्या स्मृती प्रित्यर्थ तुकाराम कॅन्सर हॉस्पीटल येथे सर्व रुग्ण व नातेवाईकांसाठी दिवसाची जेवणाची सोय करण्यात आली आहे. येथील गरिब रुग्णांना शाल, साडी, ब्लँकेट यांचे वाटप करण्यात आले आहे. त्याच बरोबर अकोल्यात दिवाळी साहित्य विक्रीस आणलेल्या महिलांना नव्या कोया साड्यांचे वाटप करण्यात आले आहे. आज या उपक्रमास भगवी पतका फडकवित शुभेच्छा देण्यात आल्या. रामकृष्ण देव, दिलीप देशपांडे, प्रकाश जोशी, रश्मि देव, डॉ.स्नेहा गोखले,,शैलेश देव, आशिष तिवारी, लल्लन मिश्रा यांच्यासह शहरातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे