रायगड जिल्हा परिषदेकडून सात ग्रामसेवकांचा गौरव सोहळा
रायगड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। रायगड जिल्हा परिषद, अलिबागच्या ग्रामपंचायत विभागामार्फत आयोजित ‘आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळा’ उत्साहात पार पडला. अलिबाग येथील क्षात्रैक्य समाज सभागृह, कुरूळ येथे झालेल्या या कार्यक्रमात अलिबाग तालुक्यात
प्रामाणिक कार्याला सलाम — जिल्हा परिषदेकडून सात ग्रामसेवकांचा गौरव सोहळा


रायगड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। रायगड जिल्हा परिषद, अलिबागच्या ग्रामपंचायत विभागामार्फत आयोजित ‘आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळा’ उत्साहात पार पडला. अलिबाग येथील क्षात्रैक्य समाज सभागृह, कुरूळ येथे झालेल्या या कार्यक्रमात अलिबाग तालुक्यातील सात ग्रामसेवकांना ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

ग्रामविकास क्षेत्रात सातत्याने प्रामाणिक, जबाबदार आणि लोकाभिमुख कार्य केल्याबद्दल जिल्हा परिषदेने श्री. जयेश हरिश्चंद्र पाटील, श्री. संजय हरिश्चंद्र पाटील, श्री. सुनील पुंडलिक महाजन, सौ. सुप्रिया शैलेश नाईक, सौ. पूजा प्रकाश पाटील आणि सौ. प्रज्योता सतीश नांदगावकर या ग्रामसेवकांचा विशेष सन्मान केला. त्यांच्या कार्यामुळे ग्रामसेवक पदाचा सामाजिक तसेच प्रशासकीय सन्मान अधिक उंचावला आहे.

कार्यक्रमाला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात आदर्श ग्रामसेवकांच्या कामाचा आढावा सादर करण्यात आला. ग्रामीण भागातील विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत या ग्रामसेवकांनी बजावलेली भूमिका सर्वांना प्रेरणादायी ठरली. पुरस्कार विजेत्यांच्या सन्मानार्थ ग्रामस्थ आणि सहकाऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. त्यांच्या प्रामाणिक व लोकाभिमुख कार्यपद्धतीने इतर ग्रामसेवकांसाठी अनुकरणीय आदर्श निर्माण झाल्याचे उपस्थितांनी मत व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande