खाजगी ट्रॅव्हल्स एजंट कडून प्रवाशांची आर्थिक लूट,
जळगाव, 18 ऑक्टोबर (हिं.स.) ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्स मालकांची मनमानी सुरु आहे. सणाच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची आर्थिक लूट केली जात आहे. उत्सव काळात होणारी गर्दी तसेच प्रवाश्यांची अडचण हेरत खासगी ट्रॅव्हल्स मालकांन
खाजगी ट्रॅव्हल्स एजंट कडून प्रवाशांची आर्थिक लूट,


जळगाव, 18 ऑक्टोबर (हिं.स.) ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्स मालकांची मनमानी सुरु आहे. सणाच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची आर्थिक लूट केली जात आहे. उत्सव काळात होणारी गर्दी तसेच प्रवाश्यांची अडचण हेरत खासगी ट्रॅव्हल्स मालकांनी भाड्यात मनमानी करून अवाच्या सव्वा वाढ केली आहे. ट्रॅव्हल्स मालकांच्या या मनमानी कारभाराचा नागरिकांना फटका बसत आहे.

सध्या दिवाळीचा उत्सव सुरु आहे. उत्सवाच्या निमित्ताने नागरिक गावाकडे परतत आहे. प्रवाश्यांची वाढती गर्दी व गरज लक्षात घेता खाजगी ट्रॅव्हल्स मालक व एजंटकडून प्रवाश्यांची लूट सुरु आहे. सामान्यतः जळगाववरून मुंबईकडे जाण्यासाठी 400 ते 600 रुपये तिकीट दर आकारला जातो मात्र मुंबई – जळगाव दरम्यान 2500 ते 3000 रुपये तिकीट दार आकारला जात आहे. हीच परिस्थिती जळगाव – पुणे दरम्यान सुरु आहे. जळगाववरून पुण्याकडे जाण्यासाठी 400 ते 600 रुपये तिकीट दर आकारला जातो मात्र पुण्याहून जळगावकडे येण्यासाठीचा तिकीट दार 2000 ते 2200 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. एक प्रकारे तिप्पट ते चौपट भाडे वाढ करत प्रवाशांची आर्थिक लुबाडणूक सुरु आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande