परभणी, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक प्रा. धुंडीराज उर्फ आबासाहेब नागोराव देशपांडे यांचे आज, शनिवार रोजी पहाटे निधन झाले. मृत्यूसमयी ते 81 वर्षांचे होत. दरम्यान प्रा. देशपांडे यांच्या पश्चात एक मुलगा ,दोन मुली, सून जावई नातवंडे असा परिवार आहे.
प्रा.देशपांडे हे श्री शिवाजी महाविद्यालयातून विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तेथून ते सेवानिवृत्त झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते लहानपणापासून स्वयंसेवक होते. जिल्हा कार्यवाह, विभागीय कार्यवाह म्हणून देशपांडे यांनी दायित्व सांभाळले होते. आणीबाणीच्या काळात ते नाशिक येथील कारागृहात 18 महिने बंदिस्त होते. संघ परिवारातील सहकार भारती या संघटनेचे ते क्षेत्रीय संघटनमंत्री म्हणून कार्यरत होते. सहकार क्षेत्रातील नामवंत जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थाचे ते संस्थापक सदस्य, अध्यक्ष होते. अतिशय शांत, संयमी, मृदु भाषी असं व्यक्तिमत्व असणारे प्रा देशपांडे हे संघ परिवारात आबासाहेब म्हणून सर्व दूर परिचित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis