जालना, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या विभागीय सरचिटणीसपदी अरविंद देशमुख यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा मराठा महासंघ कार्यालय, जालना येथे भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
श्री अरविंद देशमुख यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या विभागीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी अंदाज समिती प्रमुख तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी उपस्थित राहून देशमुख यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका बजावणारे अरविंद देशमुख यांची ही नियुक्ती मराठा समाजासाठी अभिमानास्पद असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या प्रश्नांवर प्रभावी आवाज उठेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या सत्कार समारंभाला शिवसेना संपर्कप्रमुख पंडित दादा भुतेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेना उ.बा.टा जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, भाजप जिल्हाप्रमुख भास्कर दानवे, शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले, तसेच मराठा महासंघ क्रांती मोर्चा व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis