बीड : श्री बेलेश्वर संस्थान येथे राष्ट्रवादीच्या नेते कार्यकर्त्यांचा दीपावली–स्नेह मिलन सोहळा
बीड, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। बीड तालुक्यातील श्री बेलेश्वर संस्थान येथे आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमिलनातून तालुक्यातील पुढील कामकाज, विकासाभिमुख धोरणे आणि संघटनात्मक बळकटी यावरही सकारात्मक चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार
अ


बीड, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।

बीड तालुक्यातील श्री बेलेश्वर संस्थान येथे आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमिलनातून तालुक्यातील पुढील कामकाज, विकासाभिमुख धोरणे आणि संघटनात्मक बळकटी यावरही सकारात्मक चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी पक्षाचे आमदार नेते पदाधिकारी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) राजेंद्र

मस्के परिवाराच्या वतीने दीपावलीनिमित्त बीड तालुक्यातील मौजे श्री क्षेत्र बेलेश्वर संस्थान बेलगाव येथे स्नेह मिलन व फराळ सोहळ्यास मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाला महंत श्री महादेव महाराज भारती, महंत श्री तुकाराम महाराज भारती, आमदार संदीप भैय्या क्षीरसागर,तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली.

यावेळी संबंधित सरपंच, उपसरपंच, चेअरमन, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून दीपावलीस शुभेच्छा देत परस्पर स्नेह, एकजूट आणि कार्यनिष्ठा दृढ करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande