बीड, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। परळी वैद्यनाथ ते मुंबई विशेष वंदे भारत एक्सप्रेस गाडी नव्याने सुरू करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना लेखी पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली आहे परळी वैजनाथ येथील रेल्वेचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. आज प्रसार माध्यमांना त्यांनी ही माहिती दिली आहे.
आपल्या लेखी पत्रामध्ये आमदार धनंजय मुंडे म्हणतात की, लातूर ते मुंबई जाणाऱ्या लातूर एक्सप्रेसचा आठवड्यातून किमान चार दिवस परळी मार्गे नांदेड पर्यंत पल्ला वाढवण्यात यावा, परळी वैद्यनाथ सह औंढा नागनाथ, घृष्णेश्वर ते त्र्यंबकेश्वर अशी ज्योतिर्लिंगांना जोडणारी विशेष ज्योतिर्लिंग एक्सप्रेस गाडी सुरू करावी, नांदेड पनवेल एक्सप्रेस गाडीचे एसी डबे वाढवण्यात यावेत यांसह विविध मागण्या केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis