अमरावतीसह पाच जिल्ह्यांना विशेष बाब म्हणून मिळणार अतिरिक्त मदत
अमरावती, 20 ऑक्टोबर (हिं.स.)राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीचे नुकसान मोजण्यासाठी तब्बल १७ दिवसांचा कालावधी लागला आहे.महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार ३४ जिल्ह्यांपैकी वर्धा, यवतमाळ, अमरावती, अहिल्यानगर, धुळे व नाशि
अमरावतीसह पाच जिल्ह्यांना विशेष बाब म्हणून मिळणार अतिरिक्त मदत


अमरावती, 20 ऑक्टोबर (हिं.स.)राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीचे नुकसान मोजण्यासाठी तब्बल १७ दिवसांचा कालावधी लागला आहे.महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार ३४ जिल्ह्यांपैकी वर्धा, यवतमाळ, अमरावती, अहिल्यानगर, धुळे व नाशिक या सहा जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने जाहीर केलेल्या निकषांपूर्वीच पंचनामे पूर्ण करण्यात आले होते. त्यामुळे या सहा जिल्ह्यांमध्ये नव्याने पंचनामे पूर्ण करताना विशेष बाब म्हणून दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टरवर करण्यात आली.

त्यानुसार सुमारे ७ लाख २ हजार १९ हेक्टरचे क्षेत्र वाढले आहे. राज्यात गुरुवारअखेर ६१ लाख ११ हजार २२३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले होते.आता त्यात या ७ लाख २ हजार १९ हेक्टरचे क्षेत्र अंतर्भूत करण्यात आल्यानंतर एकूण नुकसानीचे क्षेत्र ६८ लाख १३ हजार २४२ हेक्टर इतके झाले आहे. या नुकसानीमुळे राज्यातील ८३ लाख १२ हजार ९७० शेतकऱ्यांना तडाखा बसला आहे.या पंचनाम्यांनुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी राज्य सरकारकडे ७ हजार ९८ कोटी ६८ लाख २१ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे.आता राज्याचा मदत व पुनर्वसन विभाग यासंदर्भात शासन निर्णय जारी करून शेतकऱ्यांना मदत थेट खात्यावर जमा करणार आहे.

सुधारित आकडेवारी

◼️एकूण बाधित क्षेत्र : ६८,१३,२४२

एकूण बाधित जिल्हे : ३४

एकूण बाधित शेतकरी : ८३,१२,९७०

भरपाई ७०,०९८ कोटी ६८ लाख २१ हजार

राज्यातील सहा जिल्ह्यांसाठी विशेष बाब

राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने पीकांचे नुकसान झाले. त्यातील सहा जिल्ह्यांमध्ये मदतीचे निकष जाहीर करण्यापूर्वीच पंचनामे झाले होते. त्यामुळे या सहा जिल्ह्यांसाठी सरकारने नव्याने पंचनामे पूर्ण करताना विशेष बाब म्हणून २ हेक्टरची मर्यादा ३ हेक्टरपर्यंत केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande