नांदेड येथे पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या सुश्राव्य गायनाने सुरुवात
नांदेड, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा प्रशासन, गुरुद्वारा बोर्ड,नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२० ते २२ ऑक्टोबर दरम्यान दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आ
अ


नांदेड, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा प्रशासन, गुरुद्वारा बोर्ड,नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२० ते २२ ऑक्टोबर दरम्यान दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बंदाघाट येथे या कार्यक्रम होणार असून आज या कार्यक्रमाचे उदघाटन नांदेड येथील शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.आज पहिल्या दिवशी पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या सुश्राव्य गायनाने सुरवात झाली.त्यांनी भावगिते, भक्तीगिते, चित्रपट गिते सादर करून नांदेडकर रसिकांना मंत्रमुग्ध केले.यावेळी मनपा आयुक्त डोईफोडे डॉ.नंदकुमार मुलमुले,बापू दासरी, निवासी जिल्हाधिकारी किरण अंबेकर, प्रसिद्ध छायाचित्रकार विजय होकर्णे,यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande