नांदेड, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।
नांदेड शहर आणि जिल्हा
महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५-२६ त्यानिमित्ताने बुधवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय पक्ष कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्यातील खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे आमदार खासदार यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टी, नांदेड जिल्हा केंद्रीय पक्ष कार्यालयाचा उद्घाटन सोहळा नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.
प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, सर्व मोर्चा, आघाडी, पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी उपस्थित राहण्यास संदर्भात सूचना देण्यात आले आहेत तसेच नांदेड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा
बुधवार, दि. २२ ऑक्टोबर २०२५ वेळ सकाळी ११ वाजता
नाना-नानी पार्क समोर, औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis