ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच लष्कर-ए-तोयबाने उघडपणे आयोजित केली मोठी रॅली
इस्लामाबाद, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। पाकिस्तानातील ऑपरेशन सिंदूरनंतर जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबासारख्या प्रमुख दहशतवादी संघटना पूर्णपणे हादरून गेल्या आहेत. भारताच्या मिसाईल हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त झालेल्या या संघटना आता पुन्हा उभं राहण्यासाठी धडपड क
ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच लष्कर-ए-तैयबाने उघडपणे आयोजित केली मोठी रॅली


इस्लामाबाद, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। पाकिस्तानातील ऑपरेशन सिंदूरनंतर जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबासारख्या प्रमुख दहशतवादी संघटना पूर्णपणे हादरून गेल्या आहेत. भारताच्या मिसाईल हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त झालेल्या या संघटना आता पुन्हा उभं राहण्यासाठी धडपड करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पहिल्यांदाच लष्कर-ए-तोयबा पाकिस्तानात उघडपणे मोठ्या रॅलीचे आयोजन करत आहे.

लष्करने रॅलीसाठी जारी केलेल्या पोस्टरमध्ये पहलगाम हल्ल्यामुळे चर्चेत आलेल्या सैफुल्ला कसुरीचा फोटो झळकवण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या रॅलीत हाफिज सईदचा संदेश देखील वाचून दाखवला जाणार आहे. ही रॅली जिहादी शक्तींना पुन्हा एकत्र करण्याचा मोठा प्रयत्न मानला जात आहे.ही रॅली २ नोव्हेंबर रोजी लाहोरमधील मीनार-ए-पाकिस्तान येथे पार पडणार आहे. या रॅलीसाठी लष्करच्या वरिष्ठ दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर लोकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. हे आवाहन ऑपरेशन सिंदूर दरम्यान चर्चेत आलेला दहशतवादी हफीज अब्दुल रऊफ याने केले आहे.

ही रॅली भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या नजरेंत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताच्या मोस्ट वाँटेड लष्कर दहशतवादीही या रॅलीत सहभागी होण्याची शक्यता आहे. या रॅलीच्या माध्यमातून लष्कर-ए-तैयबाला पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि पाकिस्तानी लष्कर स्वतः यात योजना आखत आहे.

केवळ भारताविरोधातच नव्हे, तर टीटीपी (तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान) विरुद्ध देखील, खैबर पख्तूनख्वा भागात हे लष्करचे दहशतवादी वापरण्याचा पाक लष्कराचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. ही रॅली लष्करच्या राजकीय शाखा (पीएमएमएल) च्या बॅनरखाली आयोजित करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande