
अकोला, 24 ऑक्टोबर (हिं.स.) : अकोल्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हा पणन अधिकारी यांच्या कार्यालयात झोपा काढो हे अनोखं आंदोलन करण्यात आलंय... अकोल्यातील शेतकऱ्यांकडून हे आंदोलन करण्यात आलं.. पणन अधिकाऱ्याच्या खुर्ची समोरच झोपा काढून निषेध नोंदवण्यात आला.. हमीभावाने सोयाबीनची खरेदी करण्यासाठी सर्व खरेदी केंद्रे चालू करण्यात यावे, अतिवृष्टी, बुरशी सारख्या संकटामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन डागी झाले आहे, त्याची सुद्धा हमीभावने खरेदी करण्यात यावी, कर्जबाजारीपणा, रब्बी हंगामाची तयारी वा इतर तत्सम कारणांमुळे खुल्या बाजारात सोयाबीन विकणाऱ्या शेतकऱ्यांना क्विंटल मागे दोन हजार रुपये अनुदान देण्यात यावे... भावांतर योजना लागू करण्यात यावी. आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे.. शेतकऱ्यांनी कार्यालयातच चटई टाकून झोपा काढो हे प्रतिकात्मक आंदोलन केले.. यावेळी मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला..
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे