
अकोला, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। यावर्षी पावसाळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन व इतरही पिकाची नासाडी झाली आहे
त्याचबरोबर सोयाबीनचे दर 3500 ते 4000 हजार रुपया पर्यंत असल्याने व पिकाची नासाडी झाल्याने हतबल झालेले नेरधामना येथील तरुण शेतकरी अरविंद विठ्ठल भांबेरे वय 42 वर्ष यांनी त्यांच्या बैलाच्या गोठ्यात शेतामध्ये फवारणीसाठी आणलेले मोनोक्रोटोफास हे विषारी औषध प्राशन केले त्यांना उपचारासाठी अकोला येथे नेण्यात आले होते तेथे रात्री 8.30 वाजे दरम्यान त्यांना भरती करण्यात आले होते उपचारादरम्यान पहाटे अरविंद भांबेरे मरण पावले भांबेरे यांच्या घरची परिस्थिती नाजूक आहे त्यामुळे ते मेहनती असल्याने त्यांनी इतर शेतकऱ्यांची शेती लागवडी करिता घेतली होती त्या शेतामध्ये कपाशी सोयाबीनचा पेरा केला होता सदर पीक हातचे गेल्याने हतबल झालेले भांबेरे यांची मनस्थिती विचलित झाली होती शेतीसाठी आणलेले उसनवारी चे पैसे गेले होते सोयाबीनला भाव नाही एकरी होत असलेले उत्पन्न 25% वर आले आहे होते अशी अनेक कारणे त्यांच्या मनात घर करत होती शेती पेरणीसाठी लागलेला खर्च सोयाबीन विकूनही निघत नव्हता त्यामुळे प्रचंड प्रमाणात आर्थिक विवंचनेत असलेल्या अरविंद विठ्ठल भांबरे यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे भामरे यांच्या पक्षात पत्नी आई दोन लहान मुलं तीन भाऊ असा परिवार आहे शासनाने मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे