“तंत्रज्ञानाच्या मदतीने विवाह जुळवणी — आगरी समाज संस्थेची नवी दिशा”
रायगड, 24 ऑक्टोबर (हिं.स.)।सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रस्थानी असलेल्या आगरी समाज संस्था, अलिबाग यांनी आपल्या कार्याचा नवा अध्याय सुरू करत “विवाहमिलन वधू-वर परिचय केंद्र” या उपक्रमाचे कार्यालय अलिबाग येथे सुरू केले आहे. मोर
“तंत्रज्ञानाच्या मदतीने विवाह जुळवणी — आगरी समाज संस्थेची नवी दिशा”


रायगड, 24 ऑक्टोबर (हिं.स.)।सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रस्थानी असलेल्या आगरी समाज संस्था, अलिबाग यांनी आपल्या कार्याचा नवा अध्याय सुरू करत “विवाहमिलन वधू-वर परिचय केंद्र” या उपक्रमाचे कार्यालय अलिबाग येथे सुरू केले आहे. मोरया कॉम्प्युटर्स, ब्राह्मण आळी, महावीर चौकजवळील या कार्यालयाचा शुभारंभ सोमवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध आगरी खानावळचे मालक श्री. मंदार राऊत यांच्या हस्ते फित कापून, तर संस्थेचे वरिष्ठ सल्लागार श्री. अनंत म्हात्रे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. निलेश पाटील, उपाध्यक्ष श्री. सुनील तांबडकर, सेक्रेटरी श्री. प्रभाकर ठाकूर, सहखजिनदार श्री. राजेंद्र पाटील, तसेच अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि समाजबांधव उपस्थित होते.

या उपक्रमाद्वारे www.vivahamilan.com

या संकेतस्थळाच्या माध्यमातून सर्व जाती-धर्मातील युवक-युवतींसाठी ऑनलाइन विवाह परिचय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन नोंदणी करताना काही पालकांना भासणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, मोरया कॉम्प्युटर्सचे मालक श्री. मिलिंद पाटील यांनी कार्यालयात “नोंदणी मदत केंद्र” सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या या प्रयत्नाचे संस्थेच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले.

विवाहमिलन केंद्राचे व्यवस्थापन श्री. मनोहर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असून, दिवाळीनंतर केंद्र सकाळी ११ ते दुपारी १ आणि संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत सर्वांसाठी खुले राहील.

(संपर्क: ९४२२५९४५७१ / ८१७७८३५११८ – विवाहमिलन हेल्पलाईन)

या वेळी अध्यक्ष श्री. निलेश पाटील म्हणाले, “विवाहमिलन कार्यालय हे समाजातील विविध उपक्रमांचे प्रमुख केंद्र ठरेल. तसेच आगरी समाज भवन उभारणीसाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.”. समारोपात सर्व समाजबांधवांनी या नव्या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.

--------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande