कोल्हापूर : 'महादेवा' योजनेची फुटबॉल निवड चाचणी 31 ऑक्टोबर रोजी
कोल्हापूर, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्यात फुटबॉल खेळाचा विकास, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने ''महादेवा'' ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे.या योजनेचा एक भाग म्हणून, राज्यातील १३ वर्षांखालील मुले व मुलींसाठी जिल्हा, विभाग आणि राज
कोल्हापूर : 'महादेवा' योजनेची फुटबॉल निवड चाचणी 31 ऑक्टोबर रोजी


कोल्हापूर, 24 ऑक्टोबर (हिं.स.)।

राज्यात फुटबॉल खेळाचा विकास, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने 'महादेवा' ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे.या योजनेचा एक भाग म्हणून, राज्यातील १३ वर्षांखालील मुले व मुलींसाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर फुटबॉल निवड चाचणी होणार आहे. कोल्हापूर जिल्हास्तर 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वा. छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल संभाजीनगर, कोल्हापूर येथे निवड चाचणी होणार आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरसे यांनी दिली.

महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र), सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) यांच्या संयुक्त विद्यमाने 'महादेवा' या योजनेच्या माध्यमातून राज्यातील युवा खेळाडूंना फुटबॉलमध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

या योजनेचा एक भाग म्हणून, राज्यातील १३ वर्षांखालील मुले व मुलींसाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर फुटबॉल निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या निवड चाचणीतून निवड होणाऱ्या खेळाडूंना दिनांक १४ डिसेंबर रोजी मुंबई येथे जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची एक अभूतपूर्व संधी मिळणार आहे.

कोल्हापूर जिल्हास्तर 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वा. छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल संभाजीनगर, कोल्हापूर येथे निवड चाचणी होणार आहे. या निवड चाचण्या यश्वस्वीपणे आयोजन करण्यासाठी तांत्रिक सहकार्य वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) करणार आहे. या निवड चाचणीसाठी https://forms.gle/ctCMRZ4FZDxwYEvA7 या गुगल नोंदणी लिंकव्दारे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरसे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande