रुद्र सोमवंशीची राष्ट्रीय जिमॅस्टिस्क स्पर्धेत सुवर्ण कामगिरी, सर्वसाधारण विजेतेपदाला गवसणी
नाशिक, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। कर्नाटक येथील तुमकर येथे आयोजित राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत नाशिकच्या रुद्र हेमंत सोमवंशी याने सुंदर खेळाचे प्रदर्शन करून सुवर्णपदकाची कमाई केली. सी. आय. एस. सी. ई. याच्या अंतर्गत असलेल्या भारतातील सर्व संस्थाच्या
रुद्र हेमंत सोमवंशीची राष्ट्रीय जिमॅस्टिस्क स्पर्धेत सुवर्ण कामगिरी. सर्वसाधारण विजेतेपदाला गवसणी


नाशिक, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। कर्नाटक येथील तुमकर येथे आयोजित राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत नाशिकच्या रुद्र हेमंत सोमवंशी याने सुंदर खेळाचे प्रदर्शन करून सुवर्णपदकाची कमाई केली. सी. आय. एस. सी. ई. याच्या अंतर्गत असलेल्या भारतातील सर्व संस्थाच्या शाळां अंतर्गत आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये रुद्र सोमवंशी याने ही सुवर्ण कामगिरी केली.

या स्पर्धेत जिम्नॅस्टिक्समध्ये अंतर्भाव असलेल्या विविध प्रकारांचा समावेश होता. या सर्व प्रकारांमध्ये रुद्र याने आपल्या उत्तम खेळाचे प्रदर्शन करून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. पोमेल हॉर्स प्रकारात सुवर्ण, पॅरेलल बार या प्रकारात सुवर्ण, हाय बार या प्रकारात सुवर्ण पदक पटकावून या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम ठरत सर्वसाधारण सुवर्णपदकाला गवसणी घातली.

रुद्रच्या या सुवर्ण कामगिरीमुळे त्याची अखिल भारतीय शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

रुद्र याने याआधी राज्य स्पर्धेमध्येही पोमेल हॉर्स, पॅरेलल बार आणि हाय बार या प्रकारात सवर्णपदके तर व्हॉल्ट आणि रोमन रिंग या प्रकारात रजत पदक पटकावत या स्पर्धेमध्येही सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळविला होता.

रुद्र सोमवंशी हा वडाळा येथील अशोका युनिव्हर्सल स्कुलचा विद्यार्थी असून तो गेल्या सात वर्षांपासून आंतरराष्ट्रीय एन. आय. एस. प्रशिक्षक प्रभोदन डोणगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर रोड येथील प्रभोदन्स इंटनॅशलल अकॅडमी येथे नियमित सराव करत आहे.

रुद्र हा शालेय राष्ट्रीय स्पर्धेमध्येही अशीच कामगिरी करेल असा विश्वास प्रशिक्षक प्रभोदन डोणगांवकर यांनी व्यक्त केला. रुद्रच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल शाळेचे विश्वस्थ, मुख्याध्यापक, इतर शिक्षक आणि नाशिकच्या क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन करून पुढील स्पर्धासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande