भारताची विजयी ट्रॉफी मोहसिन नकवी यांनी अबूधाबीमध्ये ठेवली
नवी दिल्ली , 24 ऑक्टोबर (हिं.स.)। आशिया कप ट्रॉफीवरील वाद काही केल्या संपण्याचं नाव घेत नाही. आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) चे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे प्रमुख मोहसिन नकवी यांनी सुरुवातीला विजेता भारताची ट्रॉफी चोरून एसीसी मुख्
भारताची विजयी ट्रॉफी मोहसिन नकवी यांनी एसीसी मुख्यालयातून काढून अबू धाबीमध्ये ठेवली


नवी दिल्ली , 24 ऑक्टोबर (हिं.स.)। आशिया कप ट्रॉफीवरील वाद काही केल्या संपण्याचं नाव घेत नाही. आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) चे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे प्रमुख मोहसिन नकवी यांनी सुरुवातीला विजेता भारताची ट्रॉफी चोरून एसीसी मुख्यालयात ठेवली, आणि आता बातमी आहे की त्यांनी ती तिथूनही हलवून अबू धाबी येथे कुठेतरी ठेवली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाचे (बीसीसीआय) एका अधिकाऱ्यांनी अलीकडेच एसीसी मुख्यालयाला भेट दिली, जिथे त्यांना सांगण्यात आलं की ट्रॉफी तिथे नाही आणि ती सध्या मोहसिन नकवी यांच्या ताब्यात अबू धाबीमध्ये आहे.

या वादाची सुरुवात तेव्हा झाली होती, जेव्हा भारताने नकवींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. भारताने पाच विकेटने विजय मिळवल्यानंतर पोस्ट-मॅच सेरेमनी जवळपास 90 मिनिटं उशिरा सुरू झाली. या काळात एका अधिकाऱ्याने मंचावरून ट्रॉफी हटवून ती मैदानाबाहेर नेली, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली. भारत ट्रॉफीची परतफेड होण्याची वाट पाहत असतानाच, आता हा वाद एका नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मोहसिन नकवी यांनी अट ठेवली होती की, “जर भारताला खरोखरच ट्रॉफी हवी असेल, तर त्यांच्या प्रतिनिधींनी अबू धाबी येऊन ती माझ्याकडून घ्यावी.”

अलीकडेच त्यांनी आणखी एक प्रस्ताव दिला की भारताला आशिया कप 2025 ची ट्रॉफी देण्यासाठी ते एक औपचारिक समारंभ आयोजित करू इच्छितात. मात्र, भारताने त्यांचा हा प्रस्ताव फेटाळला. बीसीसीआय ने नकवी यांना अधिकृत पत्र पाठवून ट्रॉफी परत देण्याची मागणी केली होती. पण नकवी यांनी उत्तर दिलं की, “मी ट्रॉफी स्वतः पाठवणार नाही, भारताने एखादा खेळाडू पाठवून ती समारंभात घ्यावी.”

सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या एसीसी बैठकीनंतर अशी बातमी आली होती की नकवी यांनी बीसीसीआय कडे माफी मागितली आहे. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी हे संपूर्णपणे नाकारलं. आतापर्यंत भारताला ट्रॉफी हस्तांतराबाबत कोणताही औपचारिक निर्णय घेतलेला नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande